शरद पवारांचा वाढदिवस केक खाण्याच्या झुंबडीने गाजला


बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमाचा विचका


विशेष प्रतिनिधी

बीड : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांना एवढे भरते आले होते की आपण काय करतो आहोत, चांगल्या कार्यक्रमाचा विचका करतो आहोत, याचे भानच कार्यकर्त्यांना राहिले नाही. बीडमध्ये राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केक खाण्यासाठी तरूणांचीच स्टेजवरच एवढी झुंबड उडाली आणि झोंबाझोंबी केली की पोलिसांना हस्तक्षेप करून तरूणांना स्टेजवरून हटवावे लागले. त्याचवेळी आयोजकांना माईकवरून घोषणा करावी की महिलांनी कार्यक्रमाच्या मंडपातून निघून घरी जावे. उद्या सकाळी त्यांना साड्या भेटतील. sharad pawar birthday program crippled in beed

कारण केक खाण्यासाठी उसळलेली प्रचंड गर्दी नियंत्रित करणे एवढे कठीण होते की त्यातून काही दुर्घटना घडण्याची शक्यता होती. स्टेजवर सजवलेला केक खूप मोठा होता. तिथले तरूण स्टेजवरच्या नेत्यांची भाषणे संपायची वाट पाहात होते. भाषणे संपताच तरूण झुंडीने स्टेजवर घुसले आणि त्यांनी आरडाएओरडा करत केक फस्त करायला सुरवात केली. या झोंबाझोंबीत काही तरूण त्या केकच्या आयसिंगमध्ये घसरून पडले.

sharad pawar birthday program crippled in beed

या घटनेचे विडिओ राज्यभर शेअर झाले आणि धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम केक झुंबडीने गाजला.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात