पवारांसारख्या नेत्यांची अविश्वासार्हता, प्रादेशिक पक्षांच्या फुटीची भीती म्हणून सोनियांची विरोधी ऐक्याच्या राजकारणात उडी!!


शरद पवारांसारख्या नेत्यांची अविश्वासार्हता, प्रादेशिक पक्षांच्या फुटीची भीती म्हणूनच सोनिया गांधींना विरोधी ऐक्याच्या राजकारणात पुढाकार घेऊन उडी घेण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. विरोधी ऐक्यासाठी प्रयत्न सुरू होऊन बंगलोरमध्ये उद्या जेव्हा दुसरी बैठक होणार आहे, तिचे नेतृत्व सोनिया गांधी करणार आहेत. काँग्रेसने 23 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण पाठविले आहे.SCEPTICISM about sharad pawar and regional parties splits brought Sonia Gandhi “in” opposition unity serious efforts

सोनिया गांधींनी आपला राजकीय निवृत्तीचा विचार मागे टाकला आहे. त्याला अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांच्या फुटीची भीती आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांची अविश्वासार्हता यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेस मधला “राहुल प्रयोग” फसल्याची खंत देखील पडद्यामागे दडली आहे.



देशात मोदी विरोधात वातावरण तयार करायचे असेल तर केवळ प्रादेशिक नेत्यांच्या भरवशावर ते वातावरण तयार होणार नाही. कारण प्रादेशिक नेते स्वतःचेच पक्ष एकसंध राखण्यात अपयशी ठरल्याची उदाहरणे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या रूपाने देशासमोर आहेत.

भाजप चाणक्य नीति नुसार साम दाम दंड भेद वापरत प्रादेशिक पक्षांच्या मागे हात धुऊन लागल्याचे संपूर्ण देशभर पर्सेप्शन तयार झाले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पुढचा नंबर नितीश कुमार यांच्या युनायटेड जनता दलाचा आहे, याची चर्चा आधीच राजकीय वातावरणात आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे नेते जर स्वतःचाच पक्ष टिकवण्यात अपयशी ठरणार असतील तर ते विरोधी ऐक्याचे प्रयत्न कितपत क्षमतेने करू शकतील??, याविषयी फार मोठी शंका तयार झाली आहे. अशा स्थितीत मोदी विरोधात फार बलदंड नव्हे, पण किमान विशिष्ट शक्तीनिशी तरी सामना देऊ शकेल, अशी विरोधी आघाडी तयार करणे ही सोनिया गांधींसाठी सर्वात मोठी निकड तयार झाली आहे आणि म्हणूनच त्या आपला निवृत्तीचा विचार मागे सारून पुढाकार घेत विरोधी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी यांना स्वतः फोन करून बंगलोरच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे.

मोदी विरोधात राजकीय दृष्ट्या प्रामाणिकपणे लढण्याची इच्छाशक्ती असलेल्या नेत्यांवर सोनिया गांधी कॉन्सन्ट्रेट करत आहेत.

पवार अपयशी तरीही डबल गेमचा संशय

उद्धव ठाकरे आणि शरद पवार या बैठकीला जरूर हजर राहणार आहेत, पण स्वतःचेच पक्ष टिकवण्यात अपयशी ठरलेले नेते असा त्यांच्यावर शिक्का बसला आहे. त्यातही शरद पवार डबल गेम खेळण्यात माहीर आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून विरोधी ऐक्याची बोट राजकीय सागरात ढकलणे हे स्वतःचीच बोट मोडून घेण्यासारखे आहे. त्यामुळे पवार बैठकीत सामील होणार असले तरी त्यांच्या भूमिकेविषयी सोनिया गांधी यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांच्या मनात संशय तयार झाला आहे. परिणामी शरद पवारांना ज्येष्ठतेचा मान दिला जाईल, पण त्या पलीकडे विरोधी ऐक्याच्या बैठकीत त्यांच्याकडे कोणती “गंभीर निर्णयक” भूमिका असेल का? याविषयी फार मोठी शंका उत्पन्न झाली आहे.

 निवडणुकीतील परिणामाची उत्सुकता

त्यामुळेच स्वतः सोनिया गांधींसारख्या ज्येष्ठ नेत्याचा मैदानात उतरल्याने विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना एक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे विरोधी ऐक्य होईल न होईल, ते मोदींसमोर परिणामकारक आव्हान उभे करेल न करेल, पण आता विरोधी ऐक्याच्या बाबत विरोधक “गंभीर” नाहीत हा आरोप मात्र कोणी करू शकणार नाही. कारण स्वतः सोनिया गांधी यांनी युपीए 1 आणि युपीए 2 हे प्रयोग यशस्वी करून दाखवले. 10 वर्षे देशावर राज्य करून दाखवले. त्यांनी पुढाकार घेऊन प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स या नावाने विरोधी ऐक्य साधायला सुरुवात केली आहे. निवडणुकीत याचा परिणाम काय होईल??, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

SCEPTICISM about sharad pawar and regional parties splits brought Sonia Gandhi “in” opposition unity serious efforts

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात