सकाळ – साम सर्व्हेत 65 % मतदारांचा भाजपला कौल; मुख्यमंत्री पदाची फडणवीस – ठाकरेंमध्येच स्पर्धा; शिंदे – अजितदादा पिछाडीवर!!


प्रतिनिधी

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजितदादा सामील झाले. यानंतर सकाळ वृत्तसमूह आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात भाजपला तब्बल 65 % मतदारांनी एकहाती कौल दिला आहे. मुख्यमंत्री पदाची स्पर्धा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येच असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पिछाडीवर गेले आहेत. 65% voters support BJP in Sakal-Sam survey

‘सकाळ-साम’ने राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीबाबत सर्वेक्षण केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या तर मतदार कुणावर पसंती देणार, याबाबतही कल जाणून घेतला आहे.

‘सकाळ-साम’ने केलेल्या सर्वेक्षणात 74330 मतदारांची भूमिका जाणून घेतली आहे. यात विविध पक्षांना मतदान करणाऱ्या विविध वयोगटातील मतदारांचा सहभाग आहे. तसेच 50 % महिलांसह सर्व जाती-धर्मांच्या लोकांचाही समावेश केला आहे. यासह विविध व्यवसाय, नोकरी करणाऱ्या आणि आर्थिक स्थितीचाही विचार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी सकाळ संस्थेतील राज्यातील कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन लोकांकडून राज्यातील राजकीय स्थितीबाबत उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत.



देशात 2024 मध्ये लोकसभा तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची चर्चा वारंवार होत आहे. याचाही विचार या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणातून मतदारांना दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर आपण एकाच पक्षाला मतदान करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला सहभागी मतदारांपैकी तब्बल 46.9 % मतदारांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. तर 27.3 % मतदारांनी आम्ही दोन्ही निवडणुकांसाठी एकाच पक्षाला मतदान करणार नाही, असे सांगितले. तसेच 24.8 % मतदारांनी काही सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

या प्रश्नाला जोडूनच भाजप सत्तेत यावा असे वाटते का, याबाबत सर्वेक्षणात मतदारांचा कल जाणून घेतला आहे. या प्रश्नावर तब्बल 65 % मतदारांनी भाजप सत्तेत यावे असे उत्तर दिले आहे. 16 % मतदारांना भाजप पुन्हा सत्तेत नको, असे उत्तर दिले आहे, तर 19 % लोकांनी या प्रश्नावर काहीही सांगता येत नाही, असे उत्तर देणे पसंत केले आहे. यामुळे राज्यात भाजपच्या एकहाती सत्ता येण्यास मतदार अनुकूल असल्याचे दिसून येत आहे.

65% voters support BJP in Sakal-Sam survey

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात