विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशच्या निवडणूकीस सात – आठ महिने बाकी असताना सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. इतर पक्षांच्या आघाड्या – बैठका सुरू असताना समाजवादी पक्षाने आपले पहिले प्रचार गीत जारी केले आहे. samajwadi party prachar geet; mulayam singh absent in promo, only akhikesh yadav shown as leader
पण या पहिल्याच प्रचार गीताचे वैशिष्ट असे, ज्यांनी समाजवादी पक्ष स्थापन करून आपला राजकीय वारसा मुलाकडे सोपविला, ते दस्तुरखुद्द मुलायम सिंह यादवच या अख्ख्या प्रचार गीतातून गायब करण्यात आले आहेत. “सुख दुख में साथ निभाएंगे, अखिलेश दुबारा आएंगे”, असे या प्रचार गीताचे बोल आहेत.
मुलायम सिंह यांचे लाइव्ह फुटेज तर सोडाच पण त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यांची एक छोटीशी छबी देखील या प्रचार गीतात वापरू दिलेली दिसत नाही. इकडे महाराष्ट्रात उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी स्वतःचे नाव लिहिताना उध्दव ठाकरे असे वापरायचे. पण मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी स्वतःच्या नावाला बाळासाहेबांचे नाव जोडून उध्दव बाळासाहेब ठाकरे असे लिहायला सुरूवात केली.
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी राजद पक्ष पूर्णपणे ताब्यात घेतला असला, तरी वडील लालूप्रसाद आणि आई राबडीदेवी यांचे नाव टाकून दिलेले नाही. प्रचाराच्या पोस्टर्समध्ये त्या दोघांचेही फोटो होते. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान देखील आपल्या वडिलांचा राजकीय वारसा चालवत असल्याचे किंबहुना वडिलांचा खरा राजकीय वारसा आपल्याकडेच असल्याचा आजही दावा करताना दिसतात.
तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांनी वडील करूणानिधी यांची छबी पोस्टरवरून काढून टाकली नाही. उलट करूणानिधींचा राजकीय वारसा आपणच मजबूतीने चालवू असे मतदारांना त्यांच्या प्रतिमेचा वापर करून दाखवून दिलेय.
पण या सगळ्या नेत्यांच्या विपरीत तिकडे उत्तर अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायम सिंह यादव यांचे नाव पूर्णपणे टाकून दिलेले दिसते. किंबहुना प्रचार गीतातून त्यांनी मुलायम सिंहांना वगळून हा समाजवादी पक्ष हा आपल्या वडिलांची जहागिरी नसून आपली स्वतःचीच राजकीय जहागिरी असल्याचे ऐलान करून टाकलेले दिसून येत आहे.
समाजवादी पक्षाचे पहिले प्रचार गीत २ मिनिटे १८ सेकंदांचे आहे. त्यामध्ये फक्त समाजवादी पक्षाच्या सायकल चिन्हाबरोबर अखिलेश आणि अखिलेशच सर्वत्र दिसत आहेत. हिंदू – मुस्लीम समाजाचा राजकीय बॅलन्स संभाळण्याचा प्रयत्न दिसतोय. कोविडवरून योगी सरकारवर सडकून टीका आहे. अगदी अखेरच्या सीनमध्ये अखिलेश यांच्या बरोबर पत्नी डिंपल दिसत आहेत. पण बाकी “घरातले यादव” कोणीही नाही…!! … आणि या सगळ्यामध्ये ज्यांनी समाजवादी पक्ष स्थापन करून सत्ता आणली ते मुलायम सिंह यादव मात्र पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या राजकीय वारसाच्या वादाने असेही “वेगळे वळण” घेतल्याचे दिसून येत आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App