विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बॉलिवूड नट सैफ अली खानला रावणातला मानवी भाव साकारायचाय आणि सीताहरणाचे मानवी पातळीवर येऊन समर्थनही करायचे आहे. खुद्द त्यानेच ही विधाने बिग बजेट फिल्म आदिपुरूष बद्दल केली आहेत. या सिनेमात दक्षिणी सुपरस्टार प्रभास हा रामाची तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. saif ali khan news
आदिपुरूषची घोषणा होऊन बरेच झाले. त्याचे पोस्टरही आऊट झाले. त्या सिनेमाबद्दल गॉसिप्सही सुरू झाल्या. पण सैफ अली खानने वर केलेली विधाने गॉसिप्स नाहीत. त्याने आदिपुरूषमधील भूमिकांविषयी स्पष्ट शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्यात. राम – रावणाचे युद्ध मला मानवी पातळीवरून साकारायचे आहे.
रावणाची बहिण शुर्पणाखा हिचे नाक – कान लक्ष्मणाने दंडकारण्यातील पंचवटीत कापल्याची कथा रामायणात सांगितले जाते. नंतर तेथे निर्माण झालेल्या शहराला त्या कथेतूनच नासिक हे नाव देण्यात आले. रावणाने शुर्पणाखेवर लक्ष्मणाने केलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी रामाच्या पत्नीचे अर्थात सीतेचे हरण केले. अशा मानवी भावनेतूनच मला रावणाची भूमिका साकारायची आहे, असे सैफने सांगितले आहे. मिड डेने याची बातमी दिली आहे.
saif ali khan news
सैफच्या विधानावरून वादळ उठायला सुरवात झाली आहे. सोशल मीडियावर त्याबद्दल उलटसुलट चर्चाही व्हायला लागली आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर साकारत आहे. तेथे भव्य दीपोत्सवाचे आयोजन सरकारी पातळीवरून होत आहे. देशात त्याविषयी उत्साह आणि अनुकूल वातावरण आहे. अशा वातावरणात प्रभास आणि सैफ यांच्या भूमिका असलेला आदिपुरूष सिनेमा येतो आहे. त्याची चर्चा घडविली जात आहे. त्यातही सैफ राम आणि रावणाच्या भूमिकांविषयी मानवी भावनेतून आवर्जून बोलत आहे. त्याच्या बातम्यांवर चर्चा सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App