सांगलीत सदाभाऊंची पवारांवर टीका; पण आशिश शेलारांकडून राजू शेट्टी टार्गेट


विशेष प्रतिनिधी

सांगली : पवार साहेबांचे फार मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे करतात, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील शेतकरी मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांना धारेवर धरले, पण भाजपचे आमदार आशिश शेलारांनी माजी खासदार राजू शेट्टींना टार्गेट करणे पसंत केले. sadabhau khot targets sharad pawar, but ashish shelar choose to target raju shetty

हे दोन्ही नेते सांगलीत भाजपने आयोजित केलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले की, “शरद पवार यांनी जर म्हटले की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर तुम्ही समजा की तो नक्की पश्चिमेकडे उगवणार आहे. sadabhau khot targets sharad pawar, but ashish shelar choose to target raju shetty

पवारांचे आत्मचरित्र वाचावे की न वाचावे असा प्रश्न पडलाय, कारण पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये म्हटले आहे की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेता कामा नये. देशात कोणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आणि आता दुसरीकडे पवार दिल्लीतल्या श्रीमंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताहेत.

खोत पुढे म्हणाले की, “पवारांनी आतातरी खरे बोलावे. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटले जाईल.”

आमदार आशिष शेलार यांनी मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांना टार्गेट करत त्यांचा उल्लेख पिंजरा चित्रपटातील ‘मास्तर’ असा केला. केवळ एका मोहापायी मास्तर बाईच्या जाळ्यात अडकला होता. तसे राजू शेट्टी विधान परिषदेच्या आमदारकीपायी मोदी विरोधात गेले आहेत आणि श्रीमंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.

sadabhau khot targets sharad pawar, but ashish shelar choose to target raju shetty

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना या कृषी कायद्याविषयी मोदी सरकारची नेमकी भूमिका नागरिकांना समजवून सांगण्यासाठी भाजपने देशभरात किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण