जम्मू – काश्मीरसाठी आनंदाची बातमी; 26 डिसेंबरपासून पंतप्रधान सेहत योजना लागू होणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये डीडीसीच्या निवडणूका उत्तम संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या प्रदेशाला २६ तारखेला अनोखी भेट देणार आहेत. PM Modi to launch Ayushman Bharat health insurance scheme

देशभर लागू असलेल्या पंतप्रधान जनआरोग्य सेवेची सुरवात पंतप्रधान जय सेहत नावाने जम्मू – काश्मीरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.  २६ तारखेला खास सोहळ्यात मोदी व्हर्च्युअली या योजनेचा प्रारंभ करतील. PM Modi to launch Ayushman Bharat health insurance scheme

प्रदेशातील नागरिकांना पंतप्रधान जय सेहत योजनेतून जनआरोग्य सेवेसारखेच पाच लाख रूपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्यात येतील. या सोहळ्याला नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे देखील उपस्थित राहणार आहेत.

PM Modi to launch Ayushman Bharat health insurance scheme

प्रदेशात योजना सुरू होणार असल्याने जम्मू – काश्मीरमधील नागरिकांना देखील सर्वसामान्य भारतीय नागरिकांप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रदेशातील नागरिकांना स्थानिक पातळीवर तसेच देशभरातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुविधा पंतप्रधान जय सेहत योजनेतून मिळणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण