विशेष प्रतिनिधी
मुंबई : 70000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर. आर. आबांनी सही केली. यासंदर्भात अजितदादांनी तासगाव मध्ये जाऊन गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांचे चिरंजीव रोहित पाटलांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायची होती, पण शरद पवारांनी त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. ही माहिती खुद्द रोहित पाटलांनीच पत्रकारांना दिली. पण आज बारामतीच्या पाडव्या मेळाव्यात तिथल्या पत्रकारांशी बोलताना आर. आर. आबा पाटलांच्या स्वच्छ कारभारावर शरद पवारांनी स्तुतिसुमने उधळली.Rohit Patil was first silenced; But then Sharad Pawar talked about Aba’s “clean” governance
सिंचन घोटाळा हा विषय काही आम्ही काढला नाही. आर. आर. आबांवर तसे बोलणे मूळात योग्यच नव्हते. पण सत्ता मिळाल्यावर काहीही बोलता येते असे त्यांना वाटले म्हणून ते बोलले. पण आर. आर. आबांचा लौकिक एक स्वच्छ कारभारी म्हणून सगळ्या महाराष्ट्रात नव्हे, तर देशात होता, असा दावा शरद पवारांनी केला.
वास्तविक आर. आर. आबा पाटलांवर अजित दादांनी तासगाव मध्ये जाऊन आरोप केल्यानंतर तिथले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटलांना त्यावर बोलायचे होते. परंतु, शरद पवारांनी त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. सुप्रिया सुळे यांनी आर आर आबांच्या पत्नींना फोन करून माफी मागितली. त्यांच्याविषयी सहानुभूती दाखविली.
पण बारामतीतल्या आजच्या पाडवा मेळाव्यानंतर तिथल्या पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी आर. आर. आबा पाटलांच्या स्वच्छ कारभाराचा निर्वाळा दिला. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला, असा आरोपही पवारांनी केला.
पण पवारांना या पत्रकार परिषदेमध्ये आर. आर. आबा पाटलांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशी करण्याच्या फाईलवर स्वतःहून सही केली का??, ती सही करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या वरिष्ठांचा कुठला सल्ला घेतला होता का??, त्या सहीमागे नेमकी प्रेरणा कुणाची होती??, या संदर्भात कुठले प्रश्न विचारले नाहीत. त्यामुळे शरद पवारांना बारामतीतल्या पत्रकारांना त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज पडली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App