मलेशियातील रोहिंग्या दहशतवादी भारतात हल्ला करण्याच्या तयारीत


मलेशियामधील रोहिंग्या दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार भारतात हल्ला करण्यासाठी ही संघटना महिलेचा वापर करण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना फरार इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक यांच्या संबंध असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती मिळाली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मलेशियामधील रोहिंग्या दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार भारतात हल्ला करण्यासाठी ही संघटना महिलेचा वापर करण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना फरार इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक यांच्या संबंध असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती मिळाली आहे.

Rohingya terrorists from Malaysia prepare to attack India

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या नेतृत्वातील एक दहशतवादी संघटना पुढील काही आठवड्यांमध्ये भारतातील शहरांमध्ये हल्ले करू शकतात. या संघटनेला म्यानमारमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी गुप्तचर यंत्रणांनी या संबंधी अनेक राज्यांना सावध केले आहे. दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे.

यात २ लाख अमेरिकन डॉलर्सची देवाण-घेवाण झाली आहे. या व्यवहाराचा संबंध भारताशी आहे. याचे धागेदोरे वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक आणि कौलालंपूरचा रोहिंग्या नेता मोहम्मद नसीर यांच्याशी जुळलेले आहेत.

Rohingya terrorists from Malaysia prepare to attack India

या पैशांच्या व्यवहारातील काही भाग एका चेन्नईच्या संशयिताकडे पोहोचलेला आहे. ही व्यक्ती हवाला डीलर असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भारतात हल्ला करण्याच्या तयारीत असलेला दहशतवाद्यांचा हा समूह डिसेंबरच्या मध्यावर किंवा शेवटी बांगलादेशमार्गे भारतात येऊ शकतो.

या हल्ल्याच्या योजनेत सहभागी असलेली महिला नेमकी कोण आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. या महिलेला याच वर्षी मलेशियाहून म्यानमारला प्रशिक्षणासाठी पाठवले गेले होते. राज्यांना पाठवण्यात आलेल्या अलर्टमध्ये विशेषत: अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगरचा उल्लेख आहे. पीएफआयी संबंधित काही लोक या दहशतवादी समूहाला मदत करू शकतात, असा गुप्तचर यंत्रणांचा संशय आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात