नरेंद्र मोदींनीच घेतले होते शिख समुदायासाठी महत्वाचे निर्णय, आयआरसीटीसीने 2 कोटी ई-मेल पाठवून दिली माहिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षांत शिख समाजासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील १३ निर्णय अत्यंत महत्वाचे होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिख समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात असल्याचे दिशाभूल करणारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे आयआयसीटीसीने त्यांच्या दोन कोटी ग्राहकांना ई-मेल पाठवून मोदींनी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षांत शिख समाजासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील १३ निर्णय अत्यंत महत्वाचे होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिख समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात असल्याचे दिशाभूल करणारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे आयआयसीटीसीने त्यांच्या दोन कोटी ग्राहकांना ई-मेल पाठवून मोदींनी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. Narendra Modi who took important decisions for the Sikh community



पंतप्रधान नरेंद्र मोदी याांच्या कार्यकाळातच १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीत शिरकाण झालेल्या दंगापीडितांना न्याय दिला होता. श्री हरमंदर साहिब, जालियनवाला बाग स्मारकाला एफसीआरए नोंदणीसाठी परवानगी दिली, त्याचबरोबर लंगरवर करमाफी दिली. करतारपूर कॉरीडॉर सुरू करण्यात आला. याबरोबरच पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयांबाबत गुरूनानक जयंतीच्या दिवशी एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले होते. या सगळ्या निर्णयांची माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ई-मेलद्वारे आपल्या ग्राहकांना देत आहेत. ८ ते १० डिसेंबरपर्यंत दोन कोटी लोकांना ई-मेल पाठविण्यात आले आहेत.

Narendra Modi who took important decisions for the Sikh community

आयआरसीटीसीने याबाबत म्हटले आहे की, ग्राहकांना ४७ पानांची पुस्तिका पाठविण्यात येत आहे. जनहित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे लोकांंचे कृषि कायद्यांवर प्रबोधन करण्यात येणार आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात