क्रूझ’वर रंगली ‘रेव्ह पार्टी’, शाहरुखचा मुलगा आर्यन एनसीबीच्या ताब्यात, कोकेन, हशीश जप्त


मुंबई-गोवा दरम्यान एका ‘क्रूझ’वर समुद्रात रंगलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापा टाकला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, हशीश, मेफेड्रोन, एमडी आदी ड्रग्स जप्त केली आहेत. याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन यालाही ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ‘Rev Party’ on Cruise, Shah Rukh’s son Aryan in NCB’s possession, cocaine, hashish seized


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-गोवा दरम्यान एका ‘क्रूझ’वर समुद्रात रंगलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापा टाकला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, हशीश, मेफेड्रोन, एमडी आदी ड्रग्स जप्त केली आहेत. याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन यालाही ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीनं छापा टाकला. या क्रुझवर समुद्रकिनाऱ्यावर पार्टी सुरु होती. त्याची माहिती एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांना मिळाली होती. एनसीबीचे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. एनसीबीचे पथक स्वतः वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली क्रूझवर सामान्य प्रवासी म्हणून चढले होते. या क्रुझवर जवळपास 1500 माणसं होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे.क्रूझवरच्या अनेक खोल्यांमध्ये कसून तपासणी करण्यात आली आहे. या छाप्यात ड्रग्स, मेफेड्रोन, कोकेन आणि हॅशिश अशी चार प्रकारची ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. हे क्रुझ मुंबईपासून गोव्याला 3 दिवसांसाठी रवाना होणार होते. मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना इतर अधिकाऱ्यांसह प्रवासी म्हणून उभ्या असलेल्या जहाजावर पोहोचल्याची टीप मिळाली. जेव्हा जहाज मुंबईहून निघाले आणि मध्य समुद्रात पोहोचेल, तेव्हा पहिल्या पार्टीला सुरुवात झाली आणि जिथे ड्रग्जचे सेवन केले जात होते.
श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाईमध्ये दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
आर्यन शाहरुख खान,अरबाज मर्चंट,मोहक जसवाल, गोमित चोप्रा, मूनमून,,सारिका, इस्मित सिंह,विक्रात चोकर यांना जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे.
एनसीबीचे संचालक एस एन प्रधान म्हणाले की क्रूझवरील ड्रग्ज पार्टी बद्दल दोन आठवड्यापूर्वी माहिती मिळाली होती, यामध्ये बॉलीवूड लिंक समोर आली आहे. मात्र कोणीही आणि कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती या मध्ये गुंतलेला असो कारवाई केली जाईल.

‘Rev Party’ on Cruise, Shah Rukh’s son Aryan in NCB’s possession, cocaine, hashish seized

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात