युरोपीय महासंघाने पुरवलेल्या आर्थिक निधीचे संशोधकांनी चिज केले आहे. मेंदूतील सफेद द्रव्यातील अतिशय सूक्ष्म अशा रचनेची माहिती देणारा पहिला त्रिमितीय नकाशा युरोपीय संशोधकांनी तयार केला आहे. तब्बल १०० जणांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅनिंग करून संशोधकांना हा त्रिमितीय नकाशा बनवण्यात यश आले आहे.संशोधकांनी अत्याधुनिक संगणकांच्या साहाय्याने मेंदूच्या या भागाची छायाचित्रे घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.Researchers in Europe have created the first three-dimensional map of the brain
या प्रकल्पात इस्रायलसह इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, आणि इटलीतील संशोधकांचा समावेश आहे. सफेद द्रव्याच्या भागात चेतातंतू असतात. हे चेतातंतू पूर्ण मेंदूतील माहितीची देवाण-घेवाण करतात. भविष्यातील मेंदूविषयक अभ्यासात संदर्भ म्हणून या नकाशाचा वापर वैद्यकीय आणि प्राथमिक मेंदूविज्ञानात केला जाईल. कनेक्ट या अत्यंत क्रांतिकारक प्रकल्पाद्वारे हा नकाशा तयार करण्यात आला असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मेंदूविज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहरा येत्या काही दशकात बदलून टाकण्याची ताकद यात असणार आहे.
मानवी आरोग्य आणि विविध आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही या नकाशाचा वापर करता येणार आहे. हा नकाशा बनवण्यासाठी अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे मेंदूच्या सफेद द्रव्य असलेल्या या भागातील माहिती विस्ताराने आणि अचूक मिळवता आली. याच तंत्रज्ञानामुळे हा त्रिमितीय नकाशा तयार करणे शक्य झाले. या नकाशामुळे मेंदूच्या रचनेबद्दल नवीन माहिती मिळणार आहे. कमी स्तरावरील जीवकोषिका उच्चस्तरीय विचारप्रक्रियेशी कशा संबंधित असतात यावर प्रकाश पडणार आहे.
नवीन नकाशामुळे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने मेंदूच्या उतींचा मायक्रोमीटर-२ पर्यंत जाऊन अभ्यास करण्याचे अशक्य कोटीतील काम शक्य होणार आहे. या नकाशाची खासियत म्हणजे मेंदूच्या व्हाइट मॅटर भागातील सर्व सूक्ष्म जीवकोषिकीय रचना मोजणे शक्य होणार आहे. यात पेशींचा आकार आणि त्यांची घनताही मोजता येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App