आजकालची लग्ने लवकर मोडतात, टिकत नाहीत. लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट होतात. लग्नाला किती वर्षे झाली आहेत यापेक्षा त्यांनी एकमेकांचा किती विश्वास संपादन केला आहे, हा निकष आजकाल जास्त महत्त्वाचा ठरू लागला आहे. ही नाती टिकवायची कशी, हा आजच्या जमान्यातला मोठा प्रश्न आहे. नाती टिकवताना आपण टोकाची भूमिका तर घेत नाही ना, हे पाहणे फार गरजेचे झाले आहेReduce the relationship gap in time
पूर्वीसारखे अमूक एका नात्याकडून विशिष्ट अपेक्षा करणे आता रास्त नाही. दोघांनीही एकमेकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करून त्या गुणांच्या मदतीनेच संसाराचा गाडा सुरळीत चालवावा. केवळ कौतुकच नाही तर ते गुण आत्मसात करण्याचाही प्रयत्न करावा. नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे.
आपली चूक असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? नात्यामध्ये कोणीही उच्च किंवा नीच नसल्याने मोकळेपणाने आपला दोष स्वीकारला तर जोडीदाराला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याने माझ्यासाठी अमूक केले पाहिजे, ती माझी जबाबदारी नाही असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक बाबीमध्ये दोघांनी समान वाटा उचलावा, म्हणजे एकावर दडपण येणार नाही आणि एकमेकांच्या साथीने काम पूर्णही होईल. स्त्रियांना खूप बोलण्याची सवय असते. त्या स्वत:ची गाडी पुढे दामटवण्यात इतक्या रमतात की समोरच्याला काही बोलायचे आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
यामुळेही नात्यात दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपले म्हणणे पुढे रेटण्यापेक्षा जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा. विचार केल्यास नाती टिकवण्याच्या दृष्टीने हे फार काही अवघड काम नाही. मात्र अनेकदा असा विचार केला जात नाही. आणि त्यातून आपणच आपले जगणे मुश्कील करतो. त्यामुळे शक्य तितक्या प्रकारे नाती सांभाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App