नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू एकजुटीचा डंका वाजला आणि रामगिरी महाराजांनी “द फोकस इंडिया” वेबपोर्टलशी बोलताना वर्तविलेल्या भाकिताची जोरदार चर्चा सोशल मीडियात रंगली.Ramgiri maharaj true prediction on hindu unity
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी “द फोकस इंडिया”ने रामगिरी महाराजांची विशेष मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी जर हिंदूंची एकजूट परिणामकारक ठरू शकते, तर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ती एकजूट परिणाम का नाही करणार??, असा अचूक सवाल विचारला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात त्याचेच नेमकेपणाने प्रतिबिंब उमटले. हिंदूंच्या एकजुटीमुळे भाजप महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले.
मोदी सरकार 400 पार गेले, तर राज्यघटना बदलणार हा अजेंडा लोकसभा निवडणुकीपुरता चालला. पण नंतर तो चालणार नाही. हिंदू समाजातल्या जाती-पातींमध्ये फूट पाडून मुस्लिम अनुनय करणे हा कम्युनिस्टांचा अजेंडा आहे. पण हिंदूंची एकदा एकजूट झाली, तर जात विद्वेषाचा अजेंडा देखील कोसळून पडेल, असे भाकित रामगिरी महाराजांनी वर्तविले होते.
हिंदूंची एकजूट होत आहे. ही हिंदुत्वासाठी निश्चित सकारात्मक बाबा असल्याचे निरीक्षण देखील त्यांनी नोंदविले होते. त्यासाठी रामगिरी महाराजांनी अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उदाहरण दिले होते. अमेरिकेसारख्या ख्रिश्चन देशात हिंदूंची एकजूट जर डोनाल्ड ट्रम्प यांना उपयोगी ठरू शकते, तर महाराष्ट्रात हिंदू बहुसंख्यांक असताना त्यांनी एकजूट केली, तर विधानसभा निवडणुकीत त्याचा निश्चित उपयोग होईल, असे ते म्हणाले होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात नेमके त्याचेच प्रतिबिंब उमटले. महाराष्ट्रातील महिला खऱ्या अर्थाने पुरोगामी ठरल्या. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन हिंदू एकजुटीने मतदान केले. आरक्षणाच्या नावाखाली जाती-पाटींमध्ये फूट पाडायचा अजेंडा महाराष्ट्रातल्या महिलांनी एकजुटीने उद्ध्वस्त केला. रामगिरी महाराजांनी नेमके हेच भाकीत “द फोकस इंडिया”वर वर्तविले होते. या भाकिताची चर्चा आज सोशल मीडियावर रंगली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App