विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ३० लाखांचे बक्षीस लावले आहे. हे बक्षीस लावून ते लोकांना प्रलोभने देताहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली आहे. बक्षिसे देऊन अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात फक्त टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील,’ असा टोलाही त्यांनी रोहित पवारांना लगावला. ते नगरमध्ये बोलत होते. ram shinde allages mla rohit pawar breaking law and election code of conduct
शिंदे यांनी तर थेट रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिंदे म्हणाले, ‘राज्य निवडणूक आयोगाची आचारसंहिता ठरली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे, हे गैर आहे. एखाद्या आमदारांनी विकासाला चालना दिली पाहिजे. विकास केला पाहिजे. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास देखील दुमत नाही.
मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार हे घटनाविरोधी बोलत आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. रोहित पवार यांनी ३० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे, ते लोकांना प्रलोभने देणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी. ग्रामपंचायत निवडणूक दबाव आणून ते बिनविरोध करत असतील तर ते देश हुकूमशाहीला नेण्याचे चित्र निर्माण करत आहे.
‘आज ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ते पैसे देतात, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, खासदार, आमदार यांच्या निवडणुका अशाच बिनविरोध होतील व त्यामुळे टाटा, बिर्ला हेच लोक आमदार-खासदार होतील, असा टोलाही त्यांनी रोहित पवारांना लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App