महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत “रात्रीस खेळ चाले मतांचा कोटा फिरे आणि शिवसेनेला दाखवले दिवसा तारे!!” अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच्या एका रात्रीत आणून ठेवली आहे.Rajya Sabha elections: games played at night, quota of votes circulated; Shiv Sena was shown “day stars
2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे 2 उमेदवार शरद पवार आणि फौजिया खान यांना बिनबोभाटपणे शिवसेनेने आपली जादाची मते देऊन राज्यसभेवर पाठविले होते. पण त्याबदल्यात राष्ट्रवादीचा मात्र मनापासून पाठिंबा शिवसेनेला 2 वर्षांनंतर म्हणजे 2022 राज्यसभा निवडणुकीत मिळवता आलेला दिसत नाही. राज्यसभा निवडणुकीचा निकाल शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या बाजूने लागला तरी त्यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने संघर्षाचे ताट वाढून ठेवले होते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही!! शिवसेनेने 2 वर्षांपूर्वी बिनबोभाटपणे आणि बिनदिक्कतपणे राष्ट्रवादीच्या 2 उमेदवार यांना पाठिंबा दिला होता तसा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीने दिला नाही ही देखील वस्तुस्थिती आहे.
मतांचा कोटा फिरवा फिरवी
शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मतांचा कोटा वाढवून प्रफुल्ल पटेल यांना 42 ऐवजी 44 मते मिळतील याची बेगमी केली, असे म्हटले जात आहे. म्हणजे राष्ट्रवादीची पहिल्या प्राधान्यक्रमानेची 44 मते प्रफुल्ल पटेल यांना मिळतील तसेच एमआयएम पक्षाशी वाटाघाटी करून राष्ट्रवादीने त्यांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्याचे निश्चित करून घेतले आहे. यातून इम्रान प्रतापगढी सुरक्षित होतील. पण शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 4 मतांचा धोका पोहोचेल. याच प्रकारचा संघर्ष हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या 3 मतांच्या रूपाने दिसण्याची शक्यता आहे. याचा अर्थ संजय पवार यांना 7 मतांचा तोटा होण्याची शक्यता आहे.
पवारांनी पूर्ण शब्द पाळला नाही??
2022 च्या राज्यसभा निवडणुकीचा नीट समजावून घेतला तर पवारांनी शिवसेनेला दिलेला शब्द पूर्णपणे पाळलेला नसल्याचेच दिसून येईल येत आहे. अन्यथा शिवसेना उमेदवारापुढे संभाजीराजे राजकीय एपिसोड पासून ते सध्याच्या मतदाना पर्यंत संघर्षाचे ताट वाढून ठेवले गेले नसते!! पवारांनी 2 वर्षांपूर्वीच शब्द दिल्याप्रमाणे शिवसेनेचा दुसरा उमेदवार बिनबोभाटपणे राज्यसभेवर पोहोचला असता. पण हा शुद्ध पवारांचा आहे त्यामुळे तो शब्द तसाच्या तसा पाळला जाईल शिवसेनेची भूमिका भाबडी होती हेच सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणूनच “रात्रीस खेळ चाले, मतांचा कोटा फिरे आणि शिवसेनेला दाखवले दिवसा तारे” हा राजकीय नाट्यप्रयोग महाराष्ट्रात आज रंगला आहे!!
इम्रान प्रतापगढींना धोका, सरकारची कंबख्ती
याचा दुसरा ही अर्थ असा की शिवसेनेला डिवचले तरी शिवसेना फारसे काही करणार नाही. पण इम्रान प्रतापगढींना धोका निर्माण करून काँग्रेसला डिवचले, तर मात्र काँग्रेस महाविकास आघाडीत वेगळ्या पद्धतीने वाचपा काढल्याशिवाय राहणार नाही हे अनुभवांती राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला समजले असल्याने “रात्रीस खेळ चाले, मतांचा कोटा फिरे आणि शिवसेनेला दाखवले दिवसा तारे” हा राजकीय नाट्यप्रयोग रंगवला गेला आहे का!!, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App