Raj Kundra Case : शर्लिन चोप्राचा खुलासा, राज कुंद्रा म्हणाला होता की, शिल्पाला माझे व्हिडिओ आवडतात !

Raj Kundra Case Sherlyn chopra reveals Raj Kundra told me that Shilpa Shetty liked my videos

Raj Kundra Case : राज कुंद्रा प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मॉडेल-अभिनेत्री शर्लिन चोप्राला चौकशीसाठी बोलावले. ही चौकशी सुमारे 8 तास चालली. ज्यात शर्लिनने राज कुंद्राबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. शर्लिन चोप्राला 160 सीआरपीसी अंतर्गत प्रॉपर्टी सेल विभागाने बोलावले होते. पोलिसांच्या चौकशीनंतर शर्लिनने शिल्पा शेट्टीबाबत खुलासा केला आहे.  Raj Kundra Case Sherlyn chopra reveals Raj Kundra told me that Shilpa Shetty liked my videos


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज कुंद्रा प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मॉडेल-अभिनेत्री शर्लिन चोप्राला चौकशीसाठी बोलावले. ही चौकशी सुमारे 8 तास चालली. ज्यात शर्लिनने राज कुंद्राबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. शर्लिन चोप्राला 160 सीआरपीसी अंतर्गत प्रॉपर्टी सेल विभागाने बोलावले होते. पोलिसांच्या चौकशीनंतर शर्लिनने शिल्पा शेट्टीबाबत खुलासा केला आहे.

‘इंडिया टुडे’सोबतच्या खास संभाषणात शर्लिनने सांगितले की, शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओ आवडत असल्याचे सांगून राज कुंद्राने तिची दिशाभूल केली. शर्लिन पुढे म्हणाली की, राज माझा मेंटॉर होता. मी जे काही शूट करत आहे ते ग्लॅमरसाठी आहे, असे सांगून त्याने माझी दिशाभूल केली.

शिल्पा शेट्टीला आवडले व्हिडिओ

शर्लिनने सांगितले की, राज कुंद्राने तिला म्हटले होते की, शिल्पा शेट्टी तिचे व्हिडिओ आणि फोटो पसंत करत आहे. त्याने मला विश्वास दिला की, अर्ध नग्न आणि अश्लील प्रासंगिक आहे. प्रत्येकजण ते करतो म्हणून मीदेखील केले पाहिजे.

फसणार याची कल्पना नव्हती

शर्लिन म्हणाली की, मला कुठून सुरुवात करावी हे माहिती नव्हते. मी कधीच विचार केला नव्हता की एक दिवस मी अशा घोटाळ्यात अडकेन आणि मला गुन्हे शाखेसमोर जबाब द्यावा लागेल. जेव्हा मी राज कुंद्राला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला वाटले की माझे संपूर्ण आयुष्य बदलले. मला वाटले की, मला मोठा ब्रेक मिळाला आहे, पण शिल्पा शेट्टीचा नवरा मला चुकीच्या गोष्टी करायला लावेल असे मला कधी वाटले नव्हते.

शर्लिन पुढे म्हणाली की, मी Armsprime सोबत करार केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला तो एक ग्लॅमरस व्हिडिओ होता. त्यानंतर हे बोल्ड चित्रपट बनवू लागले आणि नंतर मला सेमी न्यूड आणि न्यूड व्हिडिओ बनवावे लागले. मला नेहमी सांगण्यात आले की, त्यात काहीही चुकीचे नाही, कारण प्रत्येकजण ते करतो.

शिल्पा शेट्टीकडून प्रेरणा मिळायची

शर्लिनने मुलाखतीत सांगितले की, राज कुंद्रा नेहमी तिला सांगायचा की, शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओ आणि फोटो आवडतात. यामुळे मला व्हिडिओंवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टीसारख्या लोकांकडून प्रेरित होतात, तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. जेव्हा मला असे व्हिडिओ बनवल्याबद्दल प्रशंसा मिळत असे, तेव्हा मी ते आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न करायचे.

जेव्हा शर्लिनला सांगण्यात आले की, शिल्पा शेट्टीने सर्व आरोप फेटाळले आहेत आणि तिला अशा प्रकाराची कल्पना नाही असे सांगितले, तेव्हा शर्लिन म्हणाली की शिल्पा खूप बिझी असते, ती कदाचित विसरली असेल.

Raj Kundra Case Sherlyn chopra reveals Raj Kundra told me that Shilpa Shetty liked my videos

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात