काँग्रेस अंतर्गत निवडणुकीचा खुंटा हलवून आसन बळकट करण्याकडे राहुल यांचा कल


सर्व नेत्यांना काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी हवेत; राहुलना निवडणूक पाहिजे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना पक्षाध्यक्षपदी राहुल गांधी हवे आहेत. तर खुद्द राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पाहिजे आहे. १० जनपथमध्ये झालेल्या पक्षाच्या विस्तृत बैठकीचा हा निष्कर्ष आहे. पक्षाच्या सूत्रांनीच ही माहिती दिली आहे. rahul gandhi wants election for congress president post


काँग्रेसला कायम कार्यरत राहणारा अध्यक्ष हवा असे पत्र लिहिणारे २३ ज्येष्ठ नेते बैठकीस उपस्थित होते. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले त्याचबरोबर बैठकीत जवळजवळ प्रत्येक नेत्याने राहुल गांधीच पक्षाध्यक्ष व्हावेत, असे मत आग्रहाने मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी राहुल गांधींनी मात्र पक्षात निवडणूक प्रक्रिया घेण्याची सूचना केल्याचे समजते. rahul gandhi wants election for congress president post

 

99.9% काँग्रेस नेत्यांना राहुल गांधीच पक्षाध्यक्ष व्हावेत असे वाटत असल्याचे स्टेटमेंट रणदीप सुरजेवालांनी काल रात्रीच करून आजच्या बैठकीचा राजकीय टोन नक्की केला होताच. त्याच टोनप्रमाणे पक्ष नेतृत्वाचा प्रश्नावर बहुसंख्य नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. प्रत्येकाने राहुल यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करावे, असे सूचविले. पण स्वतः राहुल यांनी मात्र पक्षात निवडणूक प्रक्रिया घ्यावी अशी महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे समजते.

 

पक्षात एकदा निवडणूक प्रक्रियेद्वारे पक्षाध्यक्षपदी निवडून आल्यास कोणी राजकीय चॅलेंज उभे करण्याच्या क्षमतेचे उरणार नाही, हा राहुल गांधींचा होरा आहे. सोनियांनी देखील एकदा हा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी जितेंद्र प्रसाद या गांधी घराण्याच्या निकटवर्तीय नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सोनियांविरोधात लढविली होती. सोनियांनी त्यांचा सहज पराभव केला होता. पण त्यांना पक्षाबाहेर काढले नव्हते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव जितीन प्रसाद यांना तर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले होते.

rahul gandhi wants election for congress president post


राहुल गांधींना असाच प्रयोग नव्याने करायचा असावा. त्यामुळे निवडणूक झाली तरी आपले आसन बळकट होईल, असा राहुल गांधींचा होरा आहे असा सूर काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातून उमटताना दिसतो आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी