आसाममधील तिवा स्वायत्त परिषदेत भाजपचा स्कोअर ३६ पैकी ३४


वृत्तसंस्था

तिवा : आसाममधील तिवा स्वायत्त परिषदेच्या निवडणूकीत भाजपने जबरदस्त मुसंडी मारली असून भाजपचा स्कोअर ३६ पैकी ३४ जागांचा झाला आहे. आसाम गण परिषदेबरोबर युती करून भाजपने ही निवडणूक लढविली होती. Assam BJP romps home with 34 out of 36 seats.

तिवा हा भाषिक प्रदेश आसाम आणि अरूणाचलच्या सीमेवर आहे. तेथे स्वायत्त परिषद स्थानिक कारभार पाहते. नागाव, मोरीगाव, होजई, कामरूप या जिल्ह्यांच्या परिसरात तिवा स्वायत्त परिषदेचे ३६ छोटे मतदारसंघ परसले आहेत. Assam BJP romps home with 34 out of 36 seats.

भाजपने नुकत्याच झालेल्या बोडोलँड स्वायत्त परिषदेच्या निवडणुकीत असेच यश मिळविले होते. राज्यात सर्वानंद सोनोवाल सरकार आल्यापासून भाजपने किती आणि कसे स्थानिक पातळीवर संघटन केले आहे, याचा या निवडणुका वस्तूपाठ ठरल्या आहेत. आधी आसाम गण परिषद आणि नंतर काँग्रेस यांच्या मजूबत संघटनांशी टक्कर घेऊन भाजपने येथे राजकीय पायरोवा केला आहे.

Assam BJP romps home with 34 out of 36 seats.

भाजपचे राष्ट्रीय संघटन महासचिव बी. एल. संतोष यांनी या विजयाबद्दल आसामच्या सर्वानंद सोनोवाल सरकारचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*