राहुल गांधींना वाटते रब्बी-खरीप म्हणजे भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत, संबित पात्रा यांनी उडविली खिल्ली

त्यांचे मेव्हणे शेतकरी आहेत हे मान्य. पण त्यांना रब्बी आणि खरीप म्हणजे त्यांना भाजपा कार्यकर्त्यांची नावे वाटतात. हा पिकांचा हंगाम आहे, हे समजत नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खिल्ली उडविली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : त्यांचे मेव्हणे शेतकरी आहेत हे मान्य. पण त्यांना रब्बी आणि खरीप म्हणजे भाजपा कार्यकर्त्यांची नावे वाटतात. हा पिकांचा हंगाम आहे, हे समजत नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांची खिल्ली उडविली आहे. Rahul Gandhi latest news

कृषि कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांंनी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केले आहे. तेव्हापासून राहुल गांधी दररोज केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दररोज ट्विट करत आहेत. आपल्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की शेतकऱ्यांंना वाटते की त्याचे उत्पन्न पंजाबमधील शेतकऱ्यांइतके व्हावे. परंतु, मोदी सरकारला वाटते की देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न बिहारमधील शेतकऱ्याइतके होते. देशातील शेतकऱ्यांना आता समजले आहे की मोदी सरकार त्यांना धोका देत आहे. त्यामुळे आता जर समझौता केला तर त्याचे भविष्य अंधकारमय असेल हे शेतकऱ्यांनी ओळखले आहे. त्यामुळे आंदोलनात मजबुतीने उभे राहा.Rahul Gandhi latest news

राहुल गांधी यांच्या या ट्वीटवर टीका करताना पात्रा म्हणाले की, राहुल गांधी यांना शेतीमधले काय समजते हे त्यांंच्या वक्तव्यावरून समजते. ज्यांना रब्बी आणि खरिपातील फरक कळत नाही ते शेतकऱ्यांचे प्रश्न काय सोडविणार? पात्रा म्हणाले की, ज्या राज्यांत आमची सरकारे नाहीत तेथेही लोक सरकारकडे येऊन सांगत आहेत की हा कायदा चांगला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही केंद्र सरकार सांगत आहे की ते कायद्यात दुरस्ती करण्यासाठी तयार आहे. तरीही काही राजकीय पक्ष आंदोलनात आपले तंबू ठोकून राजकीय लढाई लढत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*