माझा जन्म एका शेतकरी स्त्रीच्या पोटी आणि शेतकरी कुटुंबात झाला आहे. म्हणूनच मला राहुल गांधींपेक्षा शेतीबद्दल अधिक माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. Rahul Gandhi … I know more about agriculture than you, Rajnath Singh’s attack
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माझा जन्म एक शेतकरी स्त्रीच्या पोटी आणि शेतकरी कुटुंबात झाला आहे. म्हणूनच मला राहुल गांधींपेक्षा शेतीबद्दल अधिक माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका करत आहेत. त्यांना उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. मोदींचा जन्मही एका गरीब कुटुंबात झाला होता. मला राहुल गांधींपेक्षा शेतीबद्दल अधिक माहिती आहे. नवीन कृषी कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांना होईल. पण, हो किंवा नाहीच्या मानसिकतेविषयी बातचित होऊ शकत नाही. प्रत्येक कायद्याबद्दल क्लॉज बाय क्लॉज बोलायला हवे. त्यांची वेदनाही आमची वेदना आहे.
राहुल वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत. मी एक शेतकरी आईच्या पोटी जन्मलो. मला त्यांच्यापेक्षा शेतीबद्दल अधिक माहिती आहे. याशिवाय आणखी काही सांगण्याची गरज नाही. काही लोक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केली.
शेतकऱ्यांना कथितरित्या नक्षलवादी आणि खलिस्तानी म्हणण्यावर राजनाथ सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शेतकरी आपले अन्नदाता आहेत. त्यांच्याविरूद्ध अशा भाषेचा वापर करणे पूर्णपणे चुकीचे आहे. शेतकरी आंदोलनामुळेही सरकार दु: खी आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही हा एक अवघड काळ आहे, शेतकरी आम्हाला त्यातून वाचवू शकतात. त्यांनी यापुर्वीही हे केले आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर्कसंगत विचार-विमर्श व्हायला हवा असे मी म्हणेन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App