कॉंग्रेस आपल्या विचारापासून भटकली आहे. सातत्याने कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे अत्यंत दु:खाने कॉंग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणिस आणि लखनऊचे प्रभारी पं. विनोद मिश्रा यांनी यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या कॉंग्रेस प्रभारी प्रियंका गांधी – वड्रा यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. Priyanka Gandhi in Uttar Pradesh
वृत्तसंस्था
लखनऊ : कॉंग्रेस आपल्या विचारापासून भटकली आहे. सातत्याने कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे अत्यंत दु:खाने कॉंग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणिस आणि लखनऊचे प्रभारी पं. विनोद मिश्रा यांनी यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या कॉंग्रेस प्रभारी प्रियंका गांधी-वड्रा यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
उत्तर प्रदेशात गेल्या एक वर्षांच्या काळात प्रियंका वड्रा फिरकल्याच नाहीत. लखनऊच्या पक्ष कार्यालयात त्या दीड वर्षांपासून गेल्या नाहीत. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यातच पक्ष चालविला जात असलेल्या गांधी निष्ठावानांकडून कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्याचीच परिणिती विनोद शर्मा यांच्या राजीनाम्यात झाली आहे. त्यांनी पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे.
प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशाची सूत्रे देऊन कॉंग्रेस पुन्हा एकदा राज्यात आपली गेलेली पत परत मिळविण्याच्या प्रयत्नात असताना कार्यकर्तेच नाराज होऊ लागले आहेत. याचा २०२२ च्या विधानसभा निवडणुकांवर मोठा परिणाम होणार आहे. विनोद मिश्रा हे पक्षाचे वरिष्ठ नेते होते. त्याचबरोबर ब्राह्मण महासभेचे नियंत्रक आहेत. उत्तर प्रदेशातील जातीय गणितात केवळ ब्राह्मण समाजाकडूनच कॉंग्रेसला थोडीफार उमेद आहे. मात्र, मिश्रा यांच्या राजीनाम्याने ही अपेक्षाही आता फोल ठरणार आहे.
राजीनामा देताना मिश्रा म्हणाले की, गांधी परिवाराने स्वत:ला सीबीआय आणि ईडीच्या चौकशीपासून दूर ठेवण्यासाठी पक्षाला दावणीला बांधले आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला जात आहे. उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या दावणीला बांधली आहे. स्वातंत्र्य चळवळीचा दैदिप्यमान इतिहास असलेल्या कॉंग्रेसला या डाव्या नेत्यांकडून चालविले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App