विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकामधून मिळणारे आरक्षण घेऊन विषय संपवावा, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खासदार संभाजीराजे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण मराठा समाजाने घेतल्यास इसीबीसी आरक्षणाला धोका उत्पन्न होईल, अशी शंका पुण्यातच उपस्थित केल्यावर लगोलग प्रवीण गायकवाड यांनी वरील मत व्यक्त केल्याने ते नेमकी कोणाची भाषा बोलताहेत आणि कोणाच्या इशाऱ्यावरून बोलताहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. praveen gaeikwad advocates ews reservation for maratha samaj
संभाजीराजे यांनी आज सकाळीच पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आर्थिक दुर्बल घटकामधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर शंका उपस्थित केली होती. त्यांनी याबद्दल ठाकरे – पवार सरकारच्या हेतूवर शंका व्यक्त करून शरद पवारांसंदर्भातही आक्रमक वक्तव्य केले होते. एकतर पवारांनी सारथी संस्थेत लक्ष घालावे नाही तर ती बंद करून टाकावी, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी उद्विग्नता व्यक्त केली होती. praveen gaeikwad advocates ews reservation for maratha samaj
संभाजीराजे यांची पत्रकार परिषद होऊन काहीच वेळ उलटल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी ठाकरे – पवार सरकारने घेतलेल्या निर्णयावर अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यातूनच ते नेमके कोणाच्या सूचनेवरून आणि कोणाची भाषा बोलत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी पुण्यातील एका प्रमुख वृत्तपत्रातून प्रवीण गायकवाड काँग्रेसमधून उमेदवारी मिळवून द्यावी. तेच कसे पुण्यासाठी योग्य उमेदवार आहेत, प्रवीणदादाच हवेत, अशा भाषेत त्यांच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन करण्यात आले होते. परंतु, काँग्रेस पक्ष हा त्या वृत्तपत्राच्या धोरणानुसार चालत नसल्याने त्या वृत्तपत्राची शिफारस डावलून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. पण तेव्हापासूनच प्रवीण गायकवाड कोणती विधाने कोणासाठी करतात, याची चर्चा मात्र सोशल मीडियात रंगत असते.
तशीच चर्चा आताही संभाजीराजेंनी व्यक्त केलेल्या मताविरोधात प्रवीण गायकवाड यांनी मत व्यक्त केल्यानंतर सुरू झाली आहे. मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण घ्यावे आणि आरक्षणाचा विषय संपवावा असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटनादुरुस्तीनुसार शक्य नाही.
मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतोय. फडणवीस सरकारने केलेला एसईबीसीचा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा होता. घटनेच्या चौकटीत असे जातीसाठी वर्ग न निर्माण करता दिलेल आरक्षण टिकू शकत नाही, असे मतही प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App