नाशिक : विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!, असेच प्रफुल पटेल यांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेचे वर्णन करावे लागेल.Prafulla Patel denies unification of both NCPs
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नावाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कब्जा करायचा शरद पवारांचा आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांच्या इरादा होता. अजित पवारांच्या अकाली एक्झिटचे निमित्त करून सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे, असा त्यांचा “डाव” होता. पण तो “डाव” सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी हाणून पाडला.
– अजितदादांच्या इच्छेचे राजकीय भांडवल
त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी विलीनीकरणाचा फार मोठा बवाल खडा केला. अजितदादांची शेवटची इच्छा म्हणून विलीनीकरणाचे राजकीय भांडवल केले. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर कुणाला काय मिळणार याची यादीच प्रसिद्ध केली यातून फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीतलेच नेते लाभार्थी ठरत असल्याचे समोर आले. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले, की शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते बनणार होते. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री बनणार होत्या. जयंत पाटील राज्यात कॅबिनेट मंत्री, तर रोहित पवार राज्यमंत्री बनणार होते. अमोल कोल्हेंकडे एकीकृत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद येणार होते. हे सगळे फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली सूत्रे खरी मानून मराठी माध्यमांनी तशा बातम्या केल्या. पण या सगळ्या खेळीतून शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कब्जा करायचाच “डाव” असल्याचे राजकीय सत्य सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.
– प्रफुल्ल पटेलांची दिल्लीत पत्रकार परिषद
प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत आधी अजित पवारांसाठी शोकसभा घेऊन आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन विलीणीकरण वाल्यांच्या इच्छेवर पाणी फेरले. प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची अप्रत्यक्ष घोषणाच केली. सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाचा नेता बनवून उपमुख्यमंत्री केले. आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलवून सुनेत्रा पवारांना विधिवत अध्यक्ष करण्यात येईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सूचित केले.
– सुनेत्रा पवार होतील अध्यक्ष
याच पत्रकार परिषदेत त्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला नेता करायचे कुणाला नेता नाही, हे राज ठाकरे बाकीच्या कुठल्याच पक्षातले नेते सांगू शकत नाहीत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेच ठरवतील त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातलाच निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत माझे नाव नाही. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मनात असलेलेच नाव आहे. म्हणजेच सुनेत्रा पवारांचे नाव आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
VIDEO | At a press conference, NCP leader Praful Patel says, “…We decided immediately because such an issue cannot be kept pending for many days. Secondly, the party needs stability and direction. All the members, including the MLAs, felt that Sunetra ji Pawar should take up… pic.twitter.com/ih2sl1F402 — Press Trust of India (@PTI_News) February 3, 2026
VIDEO | At a press conference, NCP leader Praful Patel says, “…We decided immediately because such an issue cannot be kept pending for many days. Secondly, the party needs stability and direction. All the members, including the MLAs, felt that Sunetra ji Pawar should take up… pic.twitter.com/ih2sl1F402
— Press Trust of India (@PTI_News) February 3, 2026
– फक्त स्थानिक निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या विलीनीकरणासाठी उतावीळ असलेल्या नेत्यांच्या इच्छांवर पाणी फेरले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस फक्त महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र आल्या. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत किंवा विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी आपल्याला कधीही काही सांगितले नाही. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा सध्या प्रश्नच आमच्या समोर नाही. आमच्यासमोर फक्त आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तो आधी आम्ही सोडवणार आहोत. त्यानंतर इतर प्रश्नांकडे वाटले तर लक्ष देऊ, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी उतावीळ झालेल्या नेत्यांच्या इच्छांवर पाणी फेरले गेले.
– नेमके महत्त्व काय आणि कशाचे??
पण त्या पलीकडे जाऊन प्रफुल्ल पटेल यांनी आजची पत्रकार परिषद आणि त्याआधीची शोकसभा महाराष्ट्रात घेतली नाही ते त्यांनी दिल्लीत घेतली. प्रफुल्ल पटेल या शोकसभेआधी आणि पत्रकार परिषदेच्या आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या म्हणजेच सर्व खासदारांच्या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पटेल यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वागत असा हार घातला होता.
त्यानंतर प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या शोकसभेत सहभागी झाले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरण वाल्यांच्या इच्छांवर पाणी फेरले. यातल्या पॉलिटिकल टायमिंगला आणि शोकसभा तसेच पत्रकार परिषद घ्यायचे स्थानाला राजकीय महत्त्व आहे.
– दिल्ली दौरा टाळून पवार बारामतीत
पण सगळ्या घटना घडण्यापूर्वी आज शरद पवार दिल्लीत येणार होते. त्यांनी दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याचे सांगण्यात आले. गौतम अदानी हे त्यांना कालच मुंबईत सिल्वर ओक वर भेटून गेले होते. त्यानंतर शरद पवारांनी दिल्ली दौरा रद्द करून बारामतीला जाण्याचे ठरविल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच शरद पवार बारामती कडे गेले, त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणवाल्यांच्या इच्छांवर पाणी फेरले. त्यामुळे गौतम अदानी आणि पवार यांच्यातल्या भेटीतून विलीनीकरणाची आशा लावून बसलेल्या सगळ्यांच्या इच्छांवर सुद्धा पाणी पडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App