पवारांचे राजकीय कर्तृत्वच त्यांच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यात अडथळा ठरले


  • पवारांच्या दोन कट्टर समर्थकांचे मत; काँग्रेसच्या नेतृत्वावर सडकून टीका

विशेष प्रतिनिधी

मूंबई–नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवारांचे उत्तुंग राजकीय कर्तृत्वच त्यांच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यात अडथळा ठरल्याचे प्रतिपादन पवारांच्या दोन कट्टर समर्थक नेत्यांनी व्यक्त केले आहे. प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे मत व्यक्त केले आहे. praful patel, sanjay raut defends sharad pawar, targets congress leadership

प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी पवारांवर काँग्रेस नेतृत्त्वाने अन्याय केल्याचा दावा केला आहे. पटेल यांनी या लेखात पवारांचे पंतप्रधानपद दोनदा हुकले. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या ऐवजी पवार पंतप्रधान व्हायला हवे होते, असे लेखात म्हटले आहे. परंतु, सीताराम केसरी आणि सोनिया गांधी यांनी ते होऊ दिले नाही, असाही दावा त्यांनी लेखात केला आहे.

पवार वाढदिवस स्पेशल : मराठी माध्यमांची पवार स्तुती आणि काँग्रेस नेतृत्वावर टीकेचे बोट

पटेल यांच्या दाव्यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, “पवारांवर काँग्रेस नेतृत्वाने अन्याय केला, हे मी वारंवार म्हणत आलोय. शरद पवार हे देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. आज त्यांचे वय ८० झाले आहे. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर फक्त शरद पवार हे आहेत. पण, शरद पवारांचे राजकीय कर्तृत्व हेच त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरले. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तर भारतातील नेत्यांनी शरद पवारांच्या राजकीय वाटचालीत कायम अडथळे आणले. शरद पवार केव्हाच पंतप्रधान व्हायला हवेत होते. पण होऊ द्यायचे नाही, या एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आले,” अशा शब्दांत राऊत यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडले.

praful patel, sanjay raut defends sharad pawar, targets congress leadership

“काँग्रेसनेही कधीकाळी भाजपा-जनसंघाला संपवले होते”
“काँग्रेस दीडशे वर्षांपासून देशात काम करतोय. कुणी कुणालाही संपवू शकत नाही. दोन खासदार असलेला भाजपा आज सत्तेमध्ये आहे आणि सर्वशक्तिमान आहे, हे मान्य केले पाहिजे. तेव्हा कुणी कुणाला संपवत नाही. काँग्रेसने कधीकाळी भाजपाला संपवले होते. त्याच्या आधी जनसंघाला संपविले होते. पक्षाचा नेता पक्षाला कशी दिशा दाखवतो. कसे नेतृत्व करतो, त्यावर त्या पक्षाचे अस्तित्व आणि भवितव्य ठरते,” असा सल्ला राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात