विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेत डॉ. फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्तींच्या घराणेशाहीच्या पक्षांवर भाजपने मात केली आहे. गुपकार गटाने आपण विजयी झाल्याचा कितीही दावा केला असला तरी जागांच्या आकडेवारीत भाजपच त्यांना भारी पडल्याचे दिसते आहे. २८० पैकी २७६ जागांचे निकाल निवडणूक आयोगाच्या हवाल्याने सकाळी एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केले. त्या आकडेवारीनुसार भाजपने एकहाती कमळ चिन्हावर ७४ जागा जिंकून डीडीसी मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. त्या पाठोपाठ डॉ. अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला ६७ तर मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीला फक्त २७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस २६ जागांसह पक्ष म्हणून चौथ्या स्थानावर दिसत असली तरी ४९ जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. केंद्राने पाठिंबा दिलेल्या जम्मू – काश्मीर आपनी पार्टीला १२ जागा मिळाल्या आहेत. political dynasty of abdullahs and muftis gets a jolt by bjps big win in ddc elections
उरलेल्या जागा छोट्या पक्षांमध्ये विखुरल्या गेल्या आहेत. काल दिवसभर राष्ट्रीय वाहिन्या नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा सहभाग असणाऱ्या गुपकार गटाचा मोठा विजय झाल्याच्या बातम्या चालवत होत्या. पंरंतु, आज सकाळी तेथील चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपचाच बोलबाला सुरू झाला कारण घराणेशाहीच्या पक्षांपेक्षा त्याला अधिक जागा मिळाल्या. केंद्राने पाठिंबा दिलेला मित्र पक्ष आपनी पार्टीलाही १२ जागी विजय मिळाला. अपक्ष ४९ पैकी सुमारे २४ जण भाजप समर्थित विजयी झाले आहेत.
भाजपने काश्मीर खोऱ्यात ६० अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यापैकी २४ उमेदवार विजयी झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, भाजपने अद्याप हा आकडा अधिकृतरित्या सांगितलेला नाही. त्यामुळे गुपकार गट विजयाचा दावा करीत असला तरी आकडेवारीच्या खेळात अपक्षांच्या मदतीने भाजप त्यांच्यावर मात करू शकतो, अशी चिन्हे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App