उघडा डोळे, बघा नीट… ६ – ६.२५ लाख मतांचा अर्थ कळतो का?


जम्मू – काश्मीरमध्ये भाजपला ६ – ६.२५ लाख मते मिळाली आहेत. याचा अर्थ जनतेने ३७०, ३५ ए हटविण्यावर आणि सीएए लागू करण्यावर थंम्पिग बहुमताने शिक्कामोर्तब केले आहे. गुपकारी नेत्यांना हा जबरदस्त पंच आहे… आणि तो “मोदीजीने दिया है” म्हणत गॅस शेगडीपुढे बसणाऱ्या हातांनी तो हाणला आहे. मतांचे आकडे जे बोलताहेत ना… त्याचा खरा अर्थ हा आहे. (समजून घेणाऱ्यांना)…

विनायक ढेरे

370 कलम हटल्यानंतर प्रथमच जम्मू – काश्मीरमधली जमिनी स्तरावरची निवडणूक. घराणेशाही पोसणाऱ्या गुपकार गटाने ३७० वर हे सार्वमतच आहे… बघा काश्मीरची जनता कशी केंद्राच्या निर्णयाला भिरकावून देते अशी केलेली दर्पोक्ती… आणि काश्मीर खोऱ्यात जिथे कधीही पोहोचला नाही, असा भाजप. अशी विषम लढत राज्यात झाली. गुपकारचे तर म्हणणेच होते, इथे तिरंगा हातात घ्यायला कोणी सापडणार नाही. आम्ही आमचा झेंडाच परत फडकवणार… त्यासाठी चीन – पाकिस्तानची मदत घेणार… वगैरे… वगैरे… गुपकार नेत्यांच्या सगळ्या दर्पोक्त्या भाजपपेक्षा काश्मीरच्या जनतेने त्यांच्या घशात घातल्या.

कमळाच्या चिन्हावर ५ लाख मते भाजपच्या पारड्यात टाकली आणि केंद्र सरकार समर्थित आपनी पार्टीच्या पारड्यात ५० हजार मते टाकली. भाजप समर्थित अपक्ष २४ निवडून आलेत. त्यांच्या पारड्यात सुमारे ६५ हजार मते टाकलीत… या सहा – सव्वा सहा लाख मतांचा अर्थ कळतो… का??… गुपकारी नेत्यांना आणि त्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या लिबरल्सना…. कलम ३७०, ३५ ए हटविण्यावर आणि सीएए लागू करण्यावर जम्मू – काश्मीरच्या जनतेने खणखणीत शिक्कामोर्तब केलेय… रोकड्य़ा भाषेत बोलायचे तर गुपकारी नेत्यांना जबरदस्त पंच हाणलाय… आधीच प्रॉपर्टी अटॅचमेंटमुळे घायाळ झालेले गुपकारी नेते काश्मीरी जनतेने पंच हाणून आणखी घायाळ केलेत. the true meaning of ddc election results in jammu and kashmir, big punch to gupkar gang

हा आता ते आधीच सात पक्ष मिळून एकत्र आल्याने त्यांची डीडीसीतली संख्या मोठी दिसतेय… पण लवकरच ती संख्याही आभासी ठरण्याची शक्यता आहे… कारण ती एका चिन्हाची आणि एकदिलाची संख्या नाहीए…फक्त भाजप विरोधाने विरूद्ध दिशेला तोंडे करणाऱ्यांना एकमेकांकडे पाहण्यास भाग पडलेल्यांचा तो आकडा आहे… त्यामुळे सात पक्षांचे हे ऐक्य लवकरच दल सरोवरात बुडाले तर आश्चर्य वाटायला नको.

पण अर्थात भाजपला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. भाजपच्या केंद्रीय नेत्यांची आणि प्रदेश स्तरीय नेत्यांची फौज त्यासाठी अथकपणे परिश्रमी राहिली आहे. केंद्रीय स्तरावरचे नेते शहानवाज हुसेन, जितेंद्र सिंग, अनुराग ठाकूर, जफर इस्लाम, तरूण चुग, विजया रहाटकर यांच्या सारखे केंद्रीय नेते आणि रवी रैनासारखे प्रदेश पातळीवरचे नेते जमिनी स्तरावर उतरून तेथे राबले आहेत.

भाजप जेथे अद्याप पोहोचला नाही तेथे म्हणजे गंदरबाल, उधमपूर, कथुआ, शोपिया, बांदीपूरा, पुलवामा, किश्तवाड, अनंतनाग, दोडा, पूंच, रामबन, कुलगाम, बारामुल्ला, कुपवाडा राजौरी, रेसाई यांच्या दुर्गम भागांपर्यंत हे नेते पोहोचले आहेत. त्यांनी तेथे नुसता प्रचार केला नाही, तर स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे… भाजपसाठी ही दीर्घकाळाची राजकीय सहभागीता ठरणार आहे… असे काम उभे केले आहे. जेथे उमेदवार मिळणे दुरापास्त वाटत होते, तेथे बुथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते उभे राहिले आहेत. कै. प्रमोद महाजनांच्या राजकीय क्लस्टर बाँम्बिंगची ही सुरवात आहे.

the true meaning of ddc election results in jammu and kashmir, big punch to gupkar gang

मोदीजीने दिया है…
पण त्याही पुढचा भाग म्हणजे भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांसाठी एवढ्या जमिनी स्तरापर्यंत पोहोचण्यास मदत झाली ती मोदी सरकारच्या विविध योजनांची. जनधन खात्यांमध्ये पैसे पोहोचणे, उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी, लॉकडाऊनच्या काळातले मोफत धान्यवाटप या योजनांनी भाजपच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या आधी मोदी तिथे घराघरात पोहोचले होते. मोदीजीने दिया है, हे वाक्य तिथल्या प्रत्येक महिलेच्या तोंडी होते, असा अनुभव विजया रहाटकरांनी सांगितला आहे.

हे अक्षरशः खरे आहे. आत्तापर्यंत कोणाच्याही अगदी इंदिराजींच्याही लक्षात न आलेली धर्म, जात यांच्या पलिकडची घराघरात असलेली ही वोट बॅंक मोदींसाठी कधीच अक्टीव्हेट झाली आहे, ती आत्ता लक्षात येत आहे. काश्मीरमध्ये डीडीसीच्या निवडणूकीत या वोट बँकेने कमळाच्या चिन्हाची बटने दाबली आहेत… म्हणून मतांची संख्या सहा – सव्वा सहा लाखांवर पोहोचली आहे… आणि ही वोट बॅंक भेदणे सध्याच्या कोणत्याच राजकीय पक्षाच्या बा** भेदता येणे शक्य नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात