विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहाटे अचानक रकाबगंज गुरुद्वारामध्ये दाखल होऊन माथा टेकत गुरू तेगबहादूर यांना नमन केलं. रायसीना हिल्सच्या मागच्या बाजुला स्थित असणाऱ्या या गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून ‘शीख समागम’ सुरू आहे.
narendra modi visited gurudwara rakabganj, pays tribute to guru teg bahadur
उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या गुरुद्वारा रकाबगंज इथल्या दौऱ्यात कोणतीही विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती.
पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली. इंग्रजीसोबतच पंजाबी भाषेतही ट्विट करण्यात आले. जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी मी प्रार्थना केली. मला अत्यंत प्रसन्न वाटले. मी जगातील कोट्यावधी लोकांप्रमाणेच श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणाने मलाही खूप प्रेरणा दिली आहे’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या या भेटीनंतर व्यक्त केलीय.
#WATCH | PM Narendra Modi offers prayers at Gurudwara Rakab Ganj Sahib in Delhi. (Source – DD) pic.twitter.com/Ap9MchtdYP— ANI (@ANI) December 20, 2020
#WATCH | PM Narendra Modi offers prayers at Gurudwara Rakab Ganj Sahib in Delhi. (Source – DD) pic.twitter.com/Ap9MchtdYP
‘आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजींच्या ४०० व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत, ही गुरु साहेबांचीच कृपा आहे. चला, हा मंगल प्रसंगी ऐतिहासिक मार्गाने चिन्हांकित करू आणि श्री गुरु तेग बहादूरजी यांचा आदर्श साजरा करू’ असंही म्हणत आपल्या या भेटीचे काही फोटोही पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.
मुघलांशी संघर्ष आणि बलिदानगुरु तेग बहाद्दूर यांचा आज बलिदान दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा राकब गंज साहिबला पंतप्रधान मोदी यांनी आज भेट दिली आणि गुरूंना आदरांजली वाहिली. 1621 मध्ये तेग बहाद्दूर यांचा अमृतसर येथे जन्म झाला होता. गुरु हरगोविंद यांचे ते पुत्र होते. 1665 ते 1675 पर्यंत ते शिखांचे गुरु होते. गुरुग्रन्थसाहिबमध्ये त्यांच्या 115 ओव्या आहेत. गुरू तेग बहाद्दूर यांनी मुघलांशी संघर्ष केला होता. क्रूरकर्मा औरंगजेबाने कपट करून गुरू तेगबहाद्दूर यांना ठार मारले होते. सध्याच्या गुरुद्वारा राकब गंज साहिब आहे तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App