पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान जय आरोग्य योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जम्मू-काश्मीरमधील सर्व कुटुंबांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. ६६ टक्केंपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये ही योजना लागू करून पंतप्रधानांनी त्यांच्यावर मुस्लिम विरोधाचा आरोप करणाऱ्यांना थप्पड लगावली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान जय आरोग्य योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जम्मू-काश्मीरमधील सर्व कुटुंबांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. ६६ टक्केंपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये ही योजना लागू करून पंतप्रधानांनी त्यांच्यावर मुस्लिम विरोधाचा आरोप करणाऱ्यांना थप्पड लगावली आहे. PM Modi launches healthcare scheme for Jammu and kashmir
या योजनेची घोषणा करताना मोदी म्हणाले की, हे कार्ड केवळ जम्मू-काश्मीरमधील रुग्णालयांपुरते मर्यादित राहणार नाही. देशातील या योजनेंतर्गत जोडलेल्या हजारो रुग्णालयांनाही ही सुविधा मिळणार आहे. समजा तुम्ही मुंबईला गेला असाल आणि तुम्हाला अचानक या कार्डची आवश्यकता असल्यास मुंबईत हे कार्ड वापरता येईल. हे कार्ड चेन्नईमध्येही काम करेल. तेथील रुग्णालयेही मोफत सेवा देतील. जर तुम्ही कोलकाताला गेला असाल तर मात्र ते अवघड होईल, कारण तेथील सरकार आयुष्मान योजनेशी जोडलेले नाही. काही लोक असतात, काय करावे, असे म्हणत मोदींनी ममता बॅनर्जी सरकारबद्दलची नाराजीही व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांना समाधान मिळते, मग या गरीबांसाठी अजून मेहनत करण्यासाठी हे शब्दच खूप ताकद देतात. सर्व सुविधा प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ही आमच्या सरकारची वचनबद्धता आहे. या वेळी पंतप्रधानांशी संवाद साधताना जम्मू येथील कॅन्सरपिडीत रमेशलाल यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबातील सर्व 5 सदस्यांकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड आहे. आम्ही या योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारी आहोत. जर माझ्याकडे हे कार्ड नसते तर उपचार घेणे अवघड झाले असते.
मोदी सरकारवर मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप करण्यात येतो. परंतु, पंतप्रधानांनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही आपली घोषणा सार्थ ठरविली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ६६ टक्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. हिंदूंची संख्या २९ टक्के आहे. तरीदेखील मोदींनी काश्मिरात ही योजना लागू करताना कोणताही पक्षपातीपणा न करता आपल्या वचनाप्रमाणे निर्णय घेऊन दाखवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App