केंद्राच्या कृषी कायद्यांना आयआयटी, आयआयएम-बी आणि टीआयएफआरमधील 34 शिक्षणतज्ज्ञांचा पाठिंबा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पत्र


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आयआयटी, आयआयएम-बी आणि टीआयएफआरमधील यासारख्या सर्वोच्च संस्थांमधील 34 शिक्षणतज्ज्ञांनी नवीन ती कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरू , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुड़की आणि टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) यासारख्या सर्वोच्च संस्थांमधील 34 शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन शेतीविषयक कायद्यांसाठी पाठिंबा दिला आहे.  PM Modi In Support Of New Farm Laws Academicians From IITs, IIM-B And TIFR Write

1991 मध्ये औद्योगिक सुधारणानंतर शेती संपत चालली आहे. त्यामुळे सुधारणेसाठी ही एक सुवर्णसंधी शेतकऱ्यांना आहे. आम्हाला खात्री आहे की,आता शेतीसाठी चांगला काळ आला आहे. जर या सुधारणा गमावल्या तर शेतीत भारताला भवितव्य राहणार नाही,” असे या पत्रात म्हटले आहे. या कायद्यामुळे शेतकाऱ्याना चांगला भाव मिळेल. ग्राहकांनाही मदत करेल. या कायद्यामुळे शेतकर्‍यांना दलालांच्या तावडीतून मुक्त केले जाईल.

PM Modi In Support Of New Farm Laws Academicians From IITs, IIM-B And TIFR Write

याव्यतिरिक्त, पत्रात असे म्हटले आहे की “भाडे-शोधण्याच्या वर्तनाला” वाव न देता या कायद्यांचा परिणाम पारदर्शक बाजारपेठेतही होईल. या पत्राला पाठिंबा दर्शविणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरूचे प्रोफेसर जी रमेश म्हणाले की, ” किमान आधारभूत किंमत आणि बाजार समिती या दोन मुख्य मुद्द्यांबाबत सरकार संवेदनशील आहे. त्याबाबत उपायासाठी शेतकरी सुचवू शकतात.”

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात