मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; विरोधक दिल्लीच्या वेशीवर बसतात; 18000 कोटी, 10 कोटी, 9 कोटी, 8.02 कोटी, 2 कोटी, 1 लाख, 15 हजार हे आकडे काय सांगतात…??


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; पंतप्रधान शेतकरी सन्मान कार्यक्रमात तब्बल 8.02 कोटी शेतकरी – नागरिक ऑनलाइन सहभागी झाले. तसे ऑनलाइन अर्ज तेवढ्या प्रचंड संख्येने आले होते. देशभरातील सर्व न्यूज चॅनेलनी हा कार्यक्रम लाइव्ह दाखविला. देशभरात विविध सरकारी संस्थांचे आणि भाजपचे 15 हजार मोठे मेळावे, 1 लाख छोटे मेळावे यांच्यातून तब्बल 2 कोटी शेतकरी प्रत्यक्ष सहभागी झाले.PM narendra modi interacted with 2 coroe farmers virtually

मोदींनी तब्बल १० कोटी शेतकऱ्यांशी एकाच कार्यक्रमातून ४५ मिमिटांचा संवाद साधला. आणि 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांध्ये 18000 कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली… हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या कार्यक्रमाचा आकडेवारीच्या पुराव्यानिशी लेखाजोखा आहे. एवढ्या प्रचंड संख्येने एकाच कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या संख्येने देशात हे रेकॉर्ड केले आहे.

या प्रचंड आकडेवारीपुढे दिल्लीच्या नाक्या – नाक्यांवर रस्ते धरून बसलेल्या श्रीमंत शेतकरी आणि आडत्यांची संख्या किती आहे… त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदींवर निशाणा साधणाऱ्या विरोधकांची संख्या किती आहे… लाखामध्ये आणि एकदम शेकड्यांमध्ये…. आहे का कुठेतरी मॅच… किती असमान सामना आहे ना हा…

सरकारी खर्चाने मोदींनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे शेतकरी मेळावे घेतले आणि छोट्या – मध्यम शेतकऱ्यांशी संवाद साधून मोकळे झाले. आणि विरोधक दिल्लीच्या वेशीवरचे रस्ते धरून बसले होते. चार विरोधी राज्यांचे मुख्यमंत्री राष्ट्रपती भवनाची फेरी कधी मारायला मिळते आहे… याची वाट पाहात पत्रकारांशी बोलत होते.

म्हणजे इकडे मोदी १० कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत होते आणि तिकडे विरोधी पक्षांचे नेते पत्रकारांना मोदींमध्ये श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांशी संवाद करण्याचे धैर्य कसे नाही, याचे वर्णन करत होते. मोदी आणि विरोधी पक्ष यांच्यातील हा विरोधाभास एवढा ठळक होता की तो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आणि नागरिकांच्याही सहज लक्षात येत आहे. तब्बल 8.02 कोटी शेतकरी – नागरिक यांनी उगाच नव्हते कार्यक्रमात सहभादी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून ठेवले. आता एवढा सगळ्यांचा सर्व डेटा सरकारकडे जमा झाला आहे. तब्बल 2 कोटी शेतकरी सर्व देशभरातून कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊनही मोकळे झाले. त्यांचाही डेटा सरकारकडे जमा झाला आहे. सरकारच्या योजनांसाठी हा मजबूत डेटा आधार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशभरातल्या प्रदेश कार्यालयांना या कार्यक्रमाचे जमिनी स्तरावरचे नियोजन करायला लावले होते. यातून १५ हजार ठिकाणी मोठे मेळावे मोदींना ऐकत होते. १ लाख छोटे मेळावे सहभागी झाले होते… न्यूज चॅनेल लाइव्ह पाहणारे, फेसबुक, यूट्यूब, अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सहभागी झालेल्यांची संख्या अलग होती. त्याची गणती वेगळीच होती.

PM narendra modi interacted with 2 coroe farmers virtually

सरकारी खर्चाने भाजपच्या कार्यकर्त्यांना चार्ज्ड करून घेण्याचा कार्यक्रम मोदींबरोबर नड्डा यांनीही करून घेतला… विरोधक मात्र जुन्याच हत्यारांनी मोदींवर हल्ले चढवत बसले, असे आजचे एकूण राजकीय चित्र होते.

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात