पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या 7 हप्त्यांमधून शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 14 हजार कोटी रूपये जमा; यूपीए सरकारच्या काळात ७२ हजार कोटींच्या कर्जमाफीतून फक्त बँकांचा भरणा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आत्तापर्यंत एकूण सात हप्त्यांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १ लाख १४ हजार कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात एकदा ७२ हजार कोटी रूपयांची शेतकरी कर्जमाफी केली होती. PM kisan sanman scheme 1.14 lakh crore directly in farmeres bank account by modi govt

तिचा फार मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यावेळी ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नव्हती, तर बँकांमध्ये जमा केली होती. त्यातून बँकांचाच भरणा झाला होता. मात्र, मोदी सरकारने फक्त २ वर्षांत १ लाख १४ हजार कोटी रूपये एवढी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली आहे.

पश्चिम बंगाल सोडून देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश पंतप्रधान किसान सन्मान योजनेत सहभागी झाली आहेत. आजचा हप्ता जमा होण्यापूर्वी या योजनेतून ९६००० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमधल्या ७० लाख शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो.

मी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सकाळी दिली होतीच. आज जमा केलेला सातवा हप्ता त्यात मिळून ही रक्कम १ लाख १४ हजार कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. त्यावेळी अडीच हेक्टरच्या खाली शेती असणाऱ्याच शेतकऱ्यांचा समावेश योजनेत करण्यात आला होता. पण २०१९ ची निवडणूक जिंकल्यानंतर मोदी सरकारने ते सिलिंग हटवून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यायला सुरवात केली आहे.

PM kisan sanman scheme 1.14 lakh crore directly in farmeres bank account by modi govt

फक्त आयकर भरणारे शेतकरी आणि सरकारी नोकरीत असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र धरलेले नाहीत.ज्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून या योजनेचा लाभ घेतला, त्यांची पडता ळणी सुरू होऊन त्यांच्याकडून रक्कम परत वसूल करण्याचे कामही सुरू झाले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण