वृत्तसंस्था
कोलकाता – खगोलप्रेमींसह चांद्रप्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. उद्या २६ तारखेला खग्रास चंद्रग्रहणानंतर पूर्वेकडी आकाशात ‘सुपर ब्लड मून’पाहता येईल. त्या रात्री चंद्र नेहमीपेक्षा ३० टक्के अधिक मोठा आणि १४ टक्के अधिक तेजस्वी दिसेल. People cane see super blood moon tomorrow
२६ मे ला चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे. संध्याकाळी सात वाजून २३ मिनिटांनी तो पृथ्वीपासून तीन लाख ५७ हजार ३०९ कि.मी.वर असेल. खग्रास चंद्रग्रहणानंतर चंद्र पृथ्वीपासून सर्वांत जवळ येईल. खग्रास चंद्रग्रहणामुळे चंद्र काळसर लाल रंगाचा दिसतो. त्यामुळे, चंद्राची ही अवस्था ‘सुपर ब्लड मून’ म्हणून ओळखली जाते. या अवस्थेत चंद्राच्या लाल भागावरून प्रकाशाचे पृथ्वीच्या वातावरणात तुलनेने कमी विचलन होते.
येत्या २६ मे रोजी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशा रेषेत येत आहेत, की पृथ्वीवरून चंद्र पूर्ण स्वरूपात दिसेल, त्याचवेळी काही काळ चंद्राला ग्रहणही लागेल. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना काही क्षणांसाठी पृथ्वीच्या सावलीतून जाईल. त्यामुळे, खग्रास चंद्रग्रहण अनुभवता येईल. हे चंद्रग्रहण प्रामुख्याने पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, उत्तर व दक्षिण अमेरिकेतील बहुतेक भाग आणि ऑस्ट्रेलियातून पाहता येणार आहे.
चंद्रग्रहणाची खंडग्रास अवस्था दुपारी सव्वातीनला सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजून २२ मिनिटांनी संपेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App