‘शिवसेना नाव तर शिवाजी महाराजांचे घेईल पण काम मोगलांचे करेल’

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत सिलवासा येथे मंगळवारी विराट जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. Opposition party leader and Ex-CM of Maharashtra Devendra Fadanvis slammed Shivsena on the issue of extortion in public meeting at Silvassa


प्रतिनिधी

सिलवासा : “शिवसेनेचा इतिहास पहा. खंडणीचा आहे. शिवसेनेचे महाराष्ट्रातील सरकार खंडणीखोर आहे. ते वसुली सरकार दादरा नगर हवेलीत (दानह) यावे अशी तुमची इच्छा आहे का,” असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते वसूली वाले सरकार जिथे आहे तिथेच राहू दे. ते लोक नाव तर शिवाजी महाराजांचे घेतील पण काम मोगलांचे करतील, म्हणून महेश गावित यांनाच विजयी करा,” असे आवाहन त्यांनी केले.

दानह लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी चे उमेदवार महेश गावित यांच्यासाठी आयोजित विराट सभेत ते बोलत होते. गावित, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि प्रदेश प्रभारी विजया रहाटकर, प्रदेश अध्यक्ष दीपेश टंडेल, माजी खासदार नटूभाई पटेल, ज्येष्ठ नेते फतेहसिंह चौहान आदी यावेळी उपस्थित होते.


वचन दिले होते तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते ना…!!; फडणवीसांचे टोले


शिवसेनेवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक आली नसती तर बरे झाले असते. जे झाले त्याचे आम्हाला दुःख आहे. पण शिवसेनेचा संधीसाधूपणा बघा. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन ते निवडून आले आणि नंतर सत्तेसाठी काँग्रेस-एनसीपीच्या संगतीला गेले.

“दानहची निवडणूक सामान्य नाही. ही निवडणूक या प्रदेशाचे भवितव्य निश्चित करणारी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आता दिल्लीततून येणारा प्रत्येक पैसा थेट महिला, गरजू, शेतकरी आदी लाभार्थ्यांच्या खात्यात जात आहे. पंतप्रधान मोदी कोणाची जात, धर्म, भाषा, पंथ पाहून मदत देत नाहीत. केवळ गरीब आणि गरजू एवढाच निकष पाहून ते थेट बँक खात्यात पैसे पोहोचवतात,” असे फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘इलू-इलू’ चालू आहे. आणि दानह मध्ये त्यांचे काय चालू आहे,” असा प्रश्न पुरुषोत्तम रुपाला यांनी केला. शिवसेना दानह मध्ये का आली, त्यांना येथे काय करायचे आहे, त्यांना निवडून तुम्ही काय करणार? त्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या साथीदाराच्या रूपाने महेश गावित यांना दिल्लीला पाठवा, असे त्यांनी सांगितले.

“देशामध्ये जे सरकार आहे त्याच पक्षाचा खासदार विजयी करून दिल्ली आणि दानह यांच्यातले अंतर मिटवून टाका,” असे आवाहन महेश गावित यांनी केले. शिवसेना येथे जिंकली तर लोकांना ‘वाडी’ला हेलपाटे मारत बसावे लागेल. मी देशाच्या सेवेत चौदा वर्षे व्यतित केली आहेत. उर्वरित जीवन जनसेवेत घालवीन. मी सदैव तुम्हाला उपलब्ध असेन, असे गावित यांनी सांगितले.

Opposition party leader and Ex-CM of Maharashtra Devendra Fadanvis slammed Shivsena on the issue of extortion in public meeting at Silvassa

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub