दिवसभरात थोडा तरी व्यायाम करणे शरीरासाठी फार आवश्यक असते. त्यामुळे शरीर उत्तम राहते त्याचप्रमाणे दिवसभरात उत्साह अंगी राहतो. कोणतीही कामे शरीर व मन जेव्हा आनंदी व निरोगी असते तेव्हाच चांगल्या प्रकारे होतात. काही तज्ञांनी आता एक मिनिटाचा स्ट्रेच व्यायामप्रकारही शोधून काढला आहे. त्यामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. हा व्यायाम फार झटपट व वेगाने करायचा असतो.One minute stretch exercise is also important for the body
त्यामुळे त्यात शरीराची फार मोठी उर्जाही किंवा चरबीही खर्च होते. मात्र हा ६० सेकंदांचा झटपट व्यायाम स्थूल व्यक्ती किंवा हाडांचे, सांध्यांचे विकार, अतिरक्तदाब, हृदयविकार यांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी नाही. तसेच हे प्रकार करताना त्याचे तंत्र व पद्धत समजणे फार गरजेचे आहे, अन्य था दुखापत आणि वेदना होऊ शकतात.
सर्वसाधारणपणे व्यायाम करताना वॉर्म अप म्हणजे शरीर तापवणे आवश्यक असते. तसे न करता एकदम प्रखर व्यायाम केल्यास ते शरीरास अपायकारक ठरू शकते. अशा प्रकारचा व्यायामही नियमितपणे करणे जरुरीचे आहे. तसेच निदान खेळाडूंसाठी तरी सर्वांग परिपूर्ण व्यायामाला हा पर्याय नाही. ज्यांच्याकडे वेळ नाही अशांनी याचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी प्रखर व्यायाम प्रकाराची १५ ते २० आवर्तने करावीत व दोन आवर्तनातील विश्रांतीचा वेळ कमी ठेवावा. हे कमी वेळाचे असले, तरी अतिश्रमाचे काम आहे हे लक्षात ठेवा.
रोजच्या वेळापत्रकात जमत नाही म्हणून अनेक जण नियमित कसरत करत नाहीत किंवा टाळतात. अशा व्यक्तींनी ४५ मिनिटांच्या नियमित व्यायामासाठी दुय्यम पर्याय म्हणून झटपट व्यायामाचे सूत्र समजून घेतले पाहिजे. हा ६० सेकंदांचा झटपट व्यायाम चाकरमान्यांसाठी नक्कीच उपयोगी आहे. त्यामुळे मला वेळ नाही, अशी तक्रार आता कोणाला करता येणार नाही. परंतु याचे सर्व तंत्र व त्यामागील शास्त्र समजून याचा वापर केल्यास हा अनेकांना नक्कीच आरोग्यदायी ठरू शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App