दि. २५ नोव्हेंबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार असून इच्छुक ग्राहक फक्त १,१०० रुपयांमध्ये बुक करू शकतात.Oh wow New e-scooters for children under 18, no need for driving license
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात येत आहेत. इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचा कल इ वाहनांकडे आहे. ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन कॉरिट इलेक्ट्रिक आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात आणत आहे.हुव्हर कंपनी या महिन्याच्या अखेरीस बाजारात आपली नवीन हॉवर इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे.
पहिल्यांदा ही स्कूटर दिल्लीत लाँच केली जाणार आहे , त्यानंतर ती मुंबई, बेंगळुरू आणि पुणे सारख्या शहरांमध्ये लाँच केली जाईल. सध्या, ही स्कूटर प्री-बुकिंग चालू आहे. दि. २५ नोव्हेंबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार असून इच्छुक ग्राहक फक्त १,१०० रुपयांमध्ये बुक करू शकतात.
विशेष म्हणजे ही स्कूटर विशेषतः १२ ते १८ वयोगटांसाठी तसेच गोवा किंवा जयपूर सारख्या शहरांमधील पर्यटकांच्या आकर्षणासाठी तयार करण्यात आली आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरला डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर्स आणि दोन्ही टोकांना ड्युअल शॉक अॅब्झॉर्बर्स मिळतात. त्यामुळे ती २५० किलोचा भार घेऊ शकते.इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग एका तासाला फक्त २५ किलोमीटर आहे.
त्यामुळे ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाहीये. ही स्कूटर लाल, पिवळा, निळा, गुलाबी, जांभळा आणि काळ्या रंगात ग्राहकांना मिळेल. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आकर्षक फायनान्स सुविधा पुरवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App