नाशिक : MVA महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाच्या दबावाच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्याचबरोबर संजय राऊत अमित शाहांना जाऊन भेटले. अशा बातम्यांची राळ प्रसार माध्यमांनी उडवली. त्यावर काही “एक्सप्रेसिव्ह “विद्ववत्सूर्य” पत्रकारांनी या बातम्या जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाकडून पसरविण्यात आल्या आणि त्या राष्ट्रीय पक्षाने पसरविल्याचे सांगा, असे सांगण्यात आले, असा दावा केला. या दाव्यात तथ्य किती आणि कसे हा भाग अलहिदा, पण त्यावर महाराष्ट्रात मोठा गदारोळ उठला हे मात्र खरे!!MVA
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संबंधित बातम्यांवर आगपाखड केली. पण त्या बातम्यांचे खापर प्रसार माध्यमांवर फोडण्यापेक्षा त्यांनी ते भाजपवर फोडले. पण यातून अनेक सवाल तयार झाले.
मूळात असल्या भेटीगाठींच्या बातम्यांची राळ उडवण्याइतपत “पॉलिटिकल मटेरियल” काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेच का?? त्यांनी आपापसातले वाद हॉटेल ट्रायडेंट किंवा दुसऱ्या कुठल्या पंचतारांकित हॉटेल मधल्या मोठमोठ्या दालनांमध्ये मिटवण्यापेक्षा चव्हाट्यावर आणलेच का??
महाविकास आघाडीच्या 15 बैठका झाल्या 340 तास चर्चा झाली, ही माहिती स्वतः संजय राऊत यांनीच काल दिली होती. मग एवढे तास चर्चा करून विदर्भातल्या 12 जागांचा वाद का नाही मिटवता आला?? त्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या कुठल्या नेत्याची मध्यस्थी का घ्यावी लागली??, किंवा नाकारावी लागली??
आपापसांतले जागावाटपाचे वाद मिटवण्याची राजकीय प्रगल्भता किंवा “पॉलिटिकल मॅच्युरिटी” शिवसेना आणि काँग्रेस यांच्या नेत्यांकडे नाही का??
मूळात लोकसभेत महायुती वर मात करून मिळवलेला “पॉलिटिकल एडव्हांटेज” टिकून राहण्यासाठी महाविकास आघाडीने जागा वाटपाची चर्चा केव्हाच पूर्ण करायला हवी होती. इतकेच काय पण, उमेदवारी याद्या जाहीर करून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करायला हवी होती, पण ते करणे तर सोडाच, 15 बैठकांमध्ये 340 तास चर्चा करून देखील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे वाद मिटलेच नाहीत. मराठी माध्यम निर्मित “चाणक्यांनी” मध्यस्थी करून किंवा न करून ते वाद सोडवू शकले नाहीत.
एवढे सगळे “पॉलिटिकल मटेरियल” भाजप किंवा महायुतीतल्या कुठल्या दुसऱ्या पक्षाने प्रसार माध्यमांना पुरविले नाही, तर ते स्वतः शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पुरविले आहे. मग त्यातून कुठल्या बातम्या पेरल्या गेल्या आणि कथित अफवा उडविल्या गेल्या, तर दोषाचे एक बोट भाजपकडे किंवा महायुतीकडे जात असेल, तर उरलेली चार बोटे शिवसेना आणि काँग्रेस यांच्याच नेत्यांच्या दिशेने येत नाहीत का??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App