ठाकरे – पवार – फडणवीस; माध्यमांची प्रतिमा निर्मिती आणि प्रतिमा भंजन

देवेंद्र फडणवीसांबद्दल रिपोर्टिंग करताना आणि बातम्या चालवाताना त्यांची निवड कशी करण्यात आली, मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ नेते.


विशेष प्रतिनिधी

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून माध्यमे विशेषतः मराठी माध्यमे कसे रिपोर्टिंग करताहेत हे वाचल्या – पाहिल्या आणि ऐकल्यानंतर त्यांच्या प्रतिमानिर्मितीवर झगझगीत प्रकाश पडतो. याची काही उदाहरणे समजून घेता येतील.

no reporting, only image building

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हृदयविकार आहे. कोरोना काळात त्यांनी घराबाहेर पडणे वैद्यकीयदृष्ट्याच ऍडमिसिबल नव्हते आणि नाही. त्यांनी या काळात मातोश्रीवर राहुनच कारभार केला. पण माध्यमांनी त्यांची प्रतिमा कशी तयार केली… घरात बसणारा मुख्यमंत्री. अर्थात याला भाजपने केलेल्या टीकेची जोड घेण्यात आली. मात्र बातम्या आणि वार्तापत्रे मुख्यमंत्री घरात बसून राहतात या आशयावर भर देणारी ठरल्याचे दिसते. त्यात ज्येष्ठांनी मुख्यमंत्र्यांना घरातून कारभार करा. आम्ही राज्यात फिरून परिस्थितीची माहिती देतो, असे वक्तव्य केल्यानंतर माध्यमांना एक प्रकारे सिग्नल मिळाला आणि मुख्यमंत्र्यांच्या घरात बसण्याला माध्यमांनी अधिमान्यता देऊन टाकली.

  • देवेंद्र फडणवीसांबद्दल रिपोर्टिंग करताना आणि बातम्या चालवाताना त्यांची निवड कशी करण्यात आली, मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ नेते. परंतु, निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळविलेल्या महायुतीचे ते नेते आहेत. जनतेने निवडून दिलेल्या सरकारचे मुख्यमंत्री होण्याचा अधिकार त्यांचा आहे, या वास्तवाकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. त्यांची प्रतिमा काँग्रेस – राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते अशी करायच्या आधी माध्यमांनी ती जमनामसात ठसविण्याचा प्रयत्न केला. त्यात आमचा डीएनए विरोधी पक्षाचाच आहे, या चंद्रकांतदादा पाटलांच्या विधानाचा वापर करून घेण्यात आला. फडणवीसांच्या पत्नी या तर कायम सोशल मीडिया आणि मेन स्ट्रीम मीडियात सॉफ्ट टार्गेट राहिल्यात. त्यांनी काहीही केले तरी त्यांच्यावर शेरेबाजी ठरून गेली आहे.

  • या दोन्हीच्या उलट शरद पवारांची प्रतिमानिर्मिती लार्जर दॅन लाइफ करण्यात माध्यमे गुंतलीत. त्यांनी जनमताचा कौल धुडकावून विद्यमान सरकार सत्तेवर आणलेय या वास्तवाकडे त्यांच्या मुत्सद्देगिरीच्या चष्म्यातून रंगविले जातेय. यात राजकीय जाहिरातीबाजी सोडा पण माध्यमांनी त्यांच्या कर्तृत्वाचे तटस्थ विश्लेषण पूर्णपणे सोडून दिलेय. त्यांच्या प्रत्येक राजकीय खेळीला आणि कृतीला त्यांच्या मुत्सद्देगिरीची, ज्येष्ठत्वाची झालर लावण्यात माध्यमे आघाडीवर आहेत. खरे म्हणजे यात पवारांना त्यांच्याकडे नसलेले गुणही चिकटवण्यात येताहेत आणि अन्य नेत्यांकडे गुण असूनही त्यांच्याकडे दोषांच्या चष्म्यातून पाहून ते रंगवून सांगण्यात येताहेत. पवारांच्या वाढदिवसाच्या रिपोर्टिंगमध्ये तर याचा कळस गाठण्यात आला.

  • अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीतही प्रतिमाहानीचे रिपोर्टिंग अधिक होतेय. त्याला अपवादही सुप्रिया सुळेंचा ठरताना दिसतो आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बातम्या अशा प्रकारे चालविण्यात आल्या की जणू विद्यमान मुख्यमंत्र्यांना रिप्लेस करून त्या मुख्यमंत्री झाल्यात.

no reporting, only image building

  • तटस्थ, निःपक्ष विश्लेषण तर सोडाच, पण सामान्य रिपोर्टिंगही यात तसे राहिलेले दिसत नाही. प्रतिमा निर्मिती, प्रतिमा हानी आणि प्रतिमा भंजन यात ते अडकले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*