विशेष प्रतिनिधी
मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे . निरज हा रोड मराठा समाजाचा आहे . नीरज चोप्रा हा हरियाणातल्या पानिपत गावचा. पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर जे सैनिक व कुटुंब हरियाणात राहिली ती कालांतराने रोड मराठा समाज म्हणून ओळखली जाऊ लागली. Niraj chopra: Maratha Kranti Morcha to felicitate Niraj: Resolution passed in state level meeting
त्यामूळे राज्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानेही नीरज चोप्राचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे.
मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत १३ वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राचं अभिनंदन करुन त्याच्या कौतुकाचा ठराव करण्यात आला. पानीपत युद्धात देशाच्या रक्षणासाठी मराठा सैन्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. नीरज चोप्रा हा याच मराठा समाजाचा मुलगा असल्यामुळे त्याचं अभिनंदन करुन सत्कार करण्याचा ठराव या बैठकीत पार पडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App