विशेष प्रतिनिधी
पुणे : हायवे मॅन ऑफ द इंडिया आणि सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक भूपृष्ठ मंत्री नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित गडकरी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे . New upcoming movie Gadkari
या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे संपन्न झाला . या सोहळ्याला राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
यावेळी गडकरी यांची भूमिका साकारणारे राहुल चोपडा यांनी गडकरी शहीद उपस्थित राहून प्रेक्षकांची मन जिंकली. या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अभिजीत मुजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत अक्षय देशमुख फिल्म निर्मित गडकरी या चित्रपटाच्या दिग्दर्शन राजन भुसारी यांनी केले आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली असून, या चित्रपटात ऐश्वर्या डोरले , अभिलाष भुसारी, पुष्पक भट , अभय नवाथे, वेदांत देशमुख आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.
या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये गडकरी ते रोडकरी असा प्रवास दिसत आहे. नितीन गडकरी यांचा हा प्रवास सोपा नव्हता या प्रवासातील सगळे चढउतार या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. या सिनेमातून गडकरी यांचे राजकीय आणि खाजगी अशी दोन्ही आयुष्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इच्छा तिथे मार्ग असं मांडणाऱ्या गडकरी यांचा असामान्य प्रवास 27 ऑक्टोबर पासून सिनेमागृहात प्रेक्षकांना बघता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App