विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेसह अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असून तो पूर्वीच्या अन्य उपप्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो. यामुळे लसीकरणानंतर मिळालेले सुरक्षा कवच देखील गळून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. New corona virant discover
दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘सी.१.२’ या व्हेरिएंटच्या जीनोममध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. बेटा आणि डेल्टा व्हेरिएंटमध्ये अशाच प्रकारची स्थिती पाहायला मिळाली होती. या व्हेरिएंटच्या म्युटेशनचे प्रमाण हे दरवर्षी ४१.८ टक्के एवढे आहे. अन्य व्हेरिएंटच्या म्युटेशनच्या दरापेक्षा त्याचे प्रमाण हे जवळपास दुप्पट असल्याचे बोलले जाते.
दक्षिण आफ्रिकेतील दोन आघाडीच्या संशोधन संस्थांनी मे महिन्यात ‘सी.१.२’ हा व्हेरिएंट शोधून काढला आहे. हा व्हेरिएंट चीन, काँगो, मॉरेशियस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्येही आढळून आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या ‘सी.१’ या व्हेरिएंटपेक्षाही ‘सी.१.२’ हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. दक्षिण आफ्रिकेतील संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये प्रामुख्याने हाच व्हेरिएंट आढळून आला होता. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे म्युटेशन होण्याचा धोका अधिक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App