ओली, दहल सत्तासंघर्षातून नेपाळी संसदेचा “राजकीय बळी”

  • राष्ट्रपती विद्यादेवी भंडारींकडून नेपाळी संसद बरखास्त

वृत्तसंस्था

काठमांडू : नेपाळची संसद रविवारी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद बरखास्त करण्याच्या मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. nepal parliament disovled by president vidyadevi bhandari

नेपाळचे पंतप्रधान पी. के.ओली यांनी संसद बरखास्त करावी, हा प्रस्ताव घेऊन राष्ट्रपती भवनात गेले होते. त्यांनी तो भंडारी यांना सादर केला होता. त्यांनी मंत्री परिषदेच्या शिफारशीनुसार संसद बरखास्त केली असून पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहेत. या निवडणुका पुढील वर्षी 30 एप्रिल आणि 10 मे रोजी घेण्यात येत, असे भंडारी यांनी जाहीर केले.

माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड आणि विद्यमान पंतप्रधान पी. के. ओली यांच्यातील सत्तासंघर्षामुळे खरे तर नेपाळी संसदेचा बळी गेला. आहे. पी. के. ओली यांनी रविवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि संसद भंग करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.

nepal parliament disovled by president vidyadevi bhandari

संसदेत 275 सदस्य असलेल्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टी 2017 मध्ये सत्तेवर आली होती. पण, काही महिन्यांपासून पक्षात उभी फूट पडली होती. दहल आणि ओली यांच्या नेतृत्वाखाली दोन गट कार्यरत होते. त्यामुळे ओली यांना कारभार कारणे अवघड बनले होते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात