विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना सेबीने २७ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. रॉय दांपत्यावर यापूर्वी २३४ कोटी रुपये इनकम टॅक्सची चोरी आणि १२२२ कोटी रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंगचा खटलाही चालू आहे. NDTV owners Pranay Roy and Radhika Roy fined Rs 27 crore by SEBI
एनडीटीव्हीचे आर्थिक घोटाळे २००४ पासूनच सुरू आहे. जनरल अटलांटिक पार्टनर्स इन्वेस्टमेंटसोबत त्यावेळी करार केला. यावेळी देशातील सर्व कायद्यांना धाब्यावर बसविले. रॉय दांपत्याने एनडीटीव्हीचे शेअर ४३९ रुपये भावाने विकत घेतले होते. वास्तविक त्यावेळी शेअरचा भाव ४०० रुपये होता. या माध्यमातून रॉय दांपत्याने कोट्यवधी रुपये कमाविले. त्यानंतर रॉय दांपत्याने हेच शेहर पुन्हा गोल्डमॅन सॅक्स नावाच्या कंपनीला विकले.
१४.९९ टक्के शेअर असल्याने एनडीटीव्हीच्या बोर्डावर गोल्डमॅन सॅक्सचा प्रतिनिधी आला. याबाबतची कोणतीही माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिली नाही. परदेशी संस्थेचा प्रतिनिधी भारतीय माध्यम संस्थेच्या बोर्डावर येऊनही त्याची माहिती गुंतवणूकदारांनाही दिली नाही. गोल्डमॅन सॅक्सकडून पुन्हा शेअर खरेदी करण्यासाठी इंडिया बुल्स नावाच्या कंपनीकडून ५०१ कोटी रुपये कर्ज घेतले. त्यानंतर हे कर्ज चुकविण्यासाठी पुन्हा आयसीआयसीआय बॅँकेकडून ३७५ कोटी रुपये कर्ज घेतले.
वास्तविक या सगळ्यामध्ये पैसे सायफन करण्याची योजना रॉय दांपत्याने आखली होती. आयसीआयसीआय बॅँकेकडून ३७५ कोटी रुपयांचे कर्ज घेताना रॉय दांपत्याने आपले शेअर बॅँकेकडे गहाण ठेवले. मात्र, याची माहिती सेबी किंवा सरकारला दिली नाही. कोणतीही बॅँक ३० टक्केंपेक्षा जास्त शेअर गहाण ठेऊन घेऊ शकत नाही. मात्र, आयआयआयसीआय बॅँकेने रॉय दांपत्याकडून ६० टक्के शेअर गहाण ठेवले होते. सेबीच्या नियमांंचे हे उल्लंघन असल्याने २७ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App