विशेष प्रतिनिधी
नाशिक : Vijaya Rahatkar केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राची लेक सौ. विजया किशोर राहटकर ( Vijaya Rahatkar ) यांची नियुक्ती केली. त्यांनी आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या कार्याची माहिती आणि पुढच्या वाटचालीविषयी प्रसार माध्यमांशी बातचीत केलीच, पण त्याचवेळी त्यांनी तिथून नाशिककरांना आवर्जून संदेश पाठविला.Vijaya Rahatkar
विजयाताई मूळच्या नाशिककर खोचे परिवारातील कन्या. त्यांचे सगळे शालेय आणि महाविद्यालय शिक्षण नाशिक मध्येच झाले. किशोर रहाटकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर विजयाताई छत्रपती संभाजीनगरला गेल्या. तिथे राजकीय – सामाजिक जीवनात वावरल्या. त्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या, पण मूळचे नाशिकचे संस्कार या विसरल्या नाहीत. सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्यांना कायम नाशिक मधले संस्कार आणि नाशिककरांनी दिलेले प्रेम आठवतच राहिले.
मोदी सरकारने त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर शेकडो नाशिककरांनी त्यांना अभिनंदन पर संदेश धाडले. अनेकांनी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून शुभेच्छा दिल्या, पण व्यग्र कार्यक्रमांमुळे विजयताईंना अनेकांशी बोलता देखील आले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे बंधू मुकुंद खोचे यांना एक व्हिडिओ संदेश पाठविला. त्या संदेशाद्वारे विजयाताईंनी नाशिककरांचे मनापासून आभार मानले. त्यावेळी त्यांना नाशिकने दिलेले संस्कार आणि प्रेम आठवले. त्या संस्कार आणि प्रेमाच्या बळावरच आपली स्थानिक आणि राज्य पातळी पासून राष्ट्रीय पातळीपर्यंत यशस्वी वाटचाल झाली, असे त्यांनी या संदेशात कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App