वृत्तसंस्था
मुंबई – एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि शिवसेना नेता प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशन या एनजीओच्या कार्यालयावर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने छापे घातले आहेत. या छाप्यांचे तपशील अजून बाहेर यायचे आहेत. National Investigation Agency raid is underway at Shiv Sena leader and former ‘encounter specialist’ of Mumbai Police, Pradeep Sharma’s NGO – PS Foundation
प्रदीप शर्मा यांना काही दिवसांपूर्वी एनआयएच्या टीमने १७ जूनला अटक केली होती. त्यांना २८ जूनपर्यंत एनआयए कोठ़डीत ठेवण्याचे आदेशही विशेष न्यायालयाने दिले होते. कोठडीत एनआयएच्या टीमने प्रदीप शर्मांची चौकशी केली. तिच्या आधारावर त्यांच्या पीएस फाऊंडेशन या एनजीओच्या कार्यालयालवर छापे घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
या छापेमारी संदर्भात न्यूज एजन्सी एएनआयने बातमी दिली आहे. मात्र बातमीचे तपशील दिलेले नाहीत. एनआयएने ही कारवाई नेमकी कुठे केली आहे याबाबत काही माहिती दिलेली नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या एनजीओच्या कार्यालयावर एनआयएच्या टीमने छापा घातला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने प्रदीप शर्मा यांना १७ जूनला अंधेरीतील घरातून अटक केली होती. सध्या ते एनआयएच्या कोठडीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App