देशात परदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी एकूण पंधराशे जुने कायदे मोडीत काढून काही नवीन कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी देशात अनुकूल वातावरण तयार करण्यात सरकारला यश आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात परदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी एकूण पंधराशे जुने कायदे मोडीत काढून काही नवीन कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी देशात अनुकूल वातावरण तयार करण्यात सरकारला यश आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
narendra modi addressing asscoham
अॅसोचेमच्या स्थापना सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, सरकारने उत्पादन, करनिर्धारण, कामगार या क्षेत्रांत केलेल्या सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेत सकारात्मक बदल झाला आहे. कोविड १९ साथीच्या काळातही भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढली आहे. कृषी सुधारणांमुळे सहा महिन्यांत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक का करायची असा विचार करीत असत, आता ते भारतात गुंतवणूक का करू नये, असा विचार करीत आहेत. गेल्या सहा वर्षांत सरकारने मोठ्या सुधारणा राबवल्या असून त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलला आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडून कौतुक
सरकारचे दृष्टिकोनही स्पष्ट असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी सांगितले की, पूर्वी गुंतवणूकदार भारतातील कर दरांना घाबरून गुंतवणूक करीत नसत. आज कंपनी कर कमी असल्याने भारतात गुंतवणूक का करू नये असा विचार ते करीत आहेत. पूर्वी लालफितीचा कारभार होता, आता आम्ही गुंतवणूकदारांना पायघड्या घातल्या आहेत. पूर्वी सरकारी हस्तक्षेप खूप मोठा प्रमाणावर होता तो आता राहिलेला नाही. आज खासगी क्षेत्राचा सरकारवरचा विश्वास वाढला असून परदेशी गुंतवणूकदारांनाही उत्तेजन मिळत आहे. सरकारचा भर हा उत्पादन वाढवण्यावर आहे. देशांतर्गत क्षमता त्यासाठी वाढवण्यात येत असून सुधारणांमुळे जागतिक पातळीवर भारताविषयीचे मत अनुकूल झाले आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
माध्यमातून करण्यात आलेल्या कृषी सुधारणांविषयी सरकारने एक ई पुस्तिका प्रसारित केली असून त्याचे वाचन केल्यास गैरसमज दूर होऊन सरकारची भूमिका समजण्यास मदत होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App