सोनियांचे उध्दव ठाकरे यांना पत्र आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने आले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांना चांगलेच सुनावले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने आले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांना चांगलेच सुनावले आहेत.

Sonia gandhi letter to Uddhav Thackeray and Congress-NCP clash

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनिया गांधी आमच्या नेत्या आहेत आणि आघाडी सरकारच्या मार्गदर्शक आहेत. मध्यंतरी आम्ही दलित नेत्यांची बैठक घेतली होती त्या संदर्भातून हे पत्र आहे म्हणून हे पत्र मार्गदर्शनपर समजावं. नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी इतर पक्षात काय चाललंय हे बघू नये. विशेषता काँग्रेसमध्ये त्यांनी पाहू नये. आम्ही एकत्र आहोत आणि महाविकास आघाडी एकत्र काम करेल आणि व्यवस्थित चालेल याचा विश्वास आहे.

Sonia gandhi letter to Uddhav Thackeray and Congress-NCP clash

सरकार स्थापन करताना दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचे ठरविले होते. राज्यातील सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी कमी केला गेला आहे. आदिवासी आणि दलित समाजासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्यावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी मांडली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात