एन. एन. वोरा यांची मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये आग्रही मागणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भविष्यातले युध्द लढण्यासाठी भूतकाळातील युध्दाचे अनुभव, अभ्यास आवश्यक आहे. यासाठी १९६२ च्या भारत – चीन युध्दावरील हँडरसन – ब्रुक रिपोर्ट उपलब्ध करा. तो आम जनतेला खुला करायचा नसेल, तरी निदान तो सैनिकी पेशाच्या नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी तरी उपलब्ध करवून द्या, अशी महत्त्वपूर्ण मागणी माजी संरक्षण आणि गृह सचिव नरेंद्र नाथ वोरा यांनी आज चौथ्या मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. त्यावेळी वोरा बोलत होते.
N. N. Vohra demands handerson – brook report
अधिकाधिक सैन्य अधिकारी आणि सैनिक आपले अनुभव लिहिताहेत. शेअर करताहेत. जुन्या गुप्ततेच्या पठड्या मोडत आहेत ही अत्यंत चांगली बाब आहे, याचा उल्लेख करून वोरा म्हणाले, १९६२ च्या युध्दाचे विश्लेषण करण्यासाठी हँडरसन – ब्रुक यांची कमिटी नेमली. त्यांनी रिपोर्ट दिला. पण तो गुप्त ठेवण्यात आला आहे. आता देशाचीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय भू-राजनैतिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अशा स्थितीत त्या युध्दाचा अभ्यास करण्यासाठी तो रिपोर्ट निदान सैनिकी विद्यार्थी, अधिकारी, अभ्यासक यांच्यासाठी तरी उपलब्ध करवून द्यावा.
वोरा यांच्या सूचेनेला लडाखमधील चीनच्या दुःसाहसाची पार्श्वभूमी आहे. चीनने तेथे हिंसक संघर्ष केला. पण त्यांना भारतीयांपेक्षा जास्त सैनिक गमवावे लागले. तर १९६२ च्या युध्दात चीनकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळच्या राजकीय, सैनिकी आणि राजनैतिक नेतृत्त्वाच्या मर्यादा, उणिवा हँडरसन – ब्रुक रिपोर्टमध्ये ठळक उल्लेख असल्याचे सांगण्यात येते. तो बरीच वर्षे गुप्त ठेवण्यात आला आहे. आता वोरांच्या मागणीनंतर सैनिकी वर्तुळातून तो खुला करण्याच्या मागणीस अधिक पाठिंबा आणि बळ मिळू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App