#MyHandloomMyPride : ‘धागा धागा अखंड विणूया’! हातमाग काय आहे ? हातमागचा डिजीटल प्रवास…मोदी सरकारमुळे पुन्हा गुंफले धागे


  • राष्ट्रीय हातमाग दिन दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी देशात साजरा केला जातो, हा दिवस साजरा करण्याचा हेतू हातमाग उद्योगाविषयी जागरूकता पसरवणे आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक योगदानात हातमागचे महत्व , हातमाग आणि विणकरांचे उत्पन्न वाढवणे.

  • राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “#MyHandloomMyPride ची भावना वाढवून विणकरांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: आज राष्ट्रीय हातमाग दिन .7 ऑगस्ट रोजी देशात साजरा केला जातो.1905 मध्ये याच दिवशी स्वदेशी चळवळ सुरू झाली आणि या दिवशी स्वदेशी चळवळ औपचारिकपणे कोलकाताच्या टाऊन हॉलमध्ये एका जाहीर सभेत सुरू झाली. याची आठवण म्हणून भारत सरकार दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करते. राष्ट्रीय हातमाग दिवसाचे उद्घाटन 7 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नईतील मद्रास कॉलेजच्या शताब्दी कॉरिडॉर येथे करण्यात आले होते, तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जातो. #MyHandloomMyPride : ‘Let’s weave the thread unbroken’! What is handloom? The digital journey of handloom … Threads are twisted again due to Modi government

 

राष्ट्रीय हातमाग दिवसाचे महत्त्व

भारतातील हातमाग क्षेत्र कालांतराने सर्वात महत्वाचे कुटीर व्यापार म्हणून उदयास आले आहे. हातमाग विणकर कापूस, रेशीम आणि लोकर यासारख्या शुद्ध तंतूंचा वापर करून वस्तू बनवत आहेत. राष्ट्रीय हातमाग दिन आयोजित करण्याचे प्राथमिक ध्येय भारताच्या सामाजिक-आर्थिक सुधारणांमध्ये हातमागांचे योगदान ठळक करणे आहे. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त, विणकरांना कामाच्या पर्यायांबद्दल जागरूक करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

 

हातमाग उद्योग खूप प्राचीन आहे

हातमाग उद्योग प्राचीन काळापासून हात कारागीरांचे उपजीविका पुरवत आहे. हातमाग उद्योगाद्वारे उत्पादित वस्तू परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात. असे मानले जाते की सुमारे 7 लाख लोक या उद्योगाच्या विविध कामात गुंतलेले आहेत. परंतु जर आपण त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर असे म्हणता येईल की सर्व सरकारी दावे असूनही त्यांची स्थिती दयनीय आहे. तथापि, 2017 मध्ये सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता की, देशभरातील विणकर सेवा केंद्रांवर विणकरांना आधार आणि पॅन कार्ड सारख्या अनेक सरकारी सेवा दिल्या जातील.

हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक. देशभरातील कोटय़वधी लोकसंख्या विशेषत: ग्रामीण भागातील लोक या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. हातमाग कला आणि त्यातून विणल्या गेलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो तर आपल्याला इतिहासाशी त्यांची देखणी नाळ जोडलेली दिसते.

डिजिटल प्रवास-

या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मार्के टिंगच्या मदतीने पुन्हा एकदा लौकिक प्राप्त झाला आहे. हातमागाचे कपडे विणण्यास लागणारा वेळ, कष्ट, त्याच्यावरची कलाकुसर यामुळे हे कपडे महाग असतात.

पण गेल्या पाच वर्षांत हातमागाविषयी झालेला प्रचार-प्रसार ग्राहकांना पुन्हा एकदा हातमागाच्या कपडय़ांकडे घेऊन आला आहे.
हातमागाच्या कपडय़ांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी भारतीय फॅ शन डिझायनर्स आणि लॅक्मे फॅशन वीकसारखे मोठे फॅशन महोत्सव यांचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरले आहेत. लॅक्मे फॅशन वीकचा दुसरा दिवस हा दरवर्षी हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील कारागिरांना त्यांची कला या फॅशन वीकच्या जागतिक मंचावर दाखवण्याची संधी मिळते. अनेकदा या शो दरम्यान हातमागाचे कपडे कसे तयार होतात, त्यामागचे कष्ट आणि कारागिरांची अनमोल कला यांची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पोहोचवली जाते.

 

भारतातला ‘सोने की चिड़िया’ बनवणारा उद्योग

1800 च्या शतकात बंगाल केवळ भारतातच नाही तर जगात कापडउद्योगाचं महत्वाचं केंद्र बनलं होतं. इथले लोक जगभरात समुद्रामार्गे कापड पोहोचवून चांगलं उत्पन्न मिळवत होते. रेशीम उत्पादन आणि रेशमावर सोन्या-चांदीने केल्या जाणाऱ्या नक्षीकामाबद्दल अहमदाबाद जगभर प्रसिद्ध होतं. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये या कपड्यांना इतकी जास्त मागणी होती की ही मागणी थोपवण्यासाठी सरकारला त्यावर कर लावावा लागला होता.

1813 साली गव्हर्नरला ब्रिटन संसदेत एक प्रश्न विचारण्यात आला, की औद्योगिक क्रांती झाल्यानंतरही ब्रिटनमध्ये तयार झालेलं कापड भारतात विकले का जात नाही? त्यावर त्या गव्हर्नरने उत्तर दिलं होतं की, भारतातल्या कापडाची गुणवत्ता ब्रिटनच्या कापडापेक्षा जास्त आहे.

रोजगार-

हातमागाची एक साडी जरी विकत घेतली तरी अंदाजे १५ कारागिरांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. हातमागाचे कपडे दीर्घकाळ टिकतात. आणि आता फॅशन विश्वात होऊ घातलेल्या रिसायकल, फ्युजन कपडे अशा पद्धतीने या हातमागाच्या कपडय़ांचा पुन:पुन्हा सुंदर पद्धतीने वापर केला जाऊ शकतो.

 

#MyHandloomMyPride : ‘Let’s weave the thread unbroken’! What is handloom? The digital journey of handloom … Threads are twisted again due to Modi government

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात