वृत्तसंस्था
दिल्ली : भारतीय रेल्वेने डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 02123/02124) मध्ये दि. १५ ऑगस्टपासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर जोडण्यात आलेला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. याच मार्गावर पहिल्यांदा (ट्रेन क्र. 01007/01008) मुंबई -पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेष ट्रेनमध्ये दि. २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आलेला आहे.Vistadom coaches on Mumbai-Pune Deccan Queen Express now, rounds starting from August 15
या मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेता आणि डेक्कन एक्स्प्रेसमध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, आता डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसा असेल ट्रेनचा प्रवास
असे असतील ट्रेनमध्ये डबे
एक व्हिस्टाडोम कोच, ४ वातानुकूलित चेअर कार, ९ सामान्य द्वितीय आसन श्रेणी, २ द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ पॅन्ट्री कार.
असे करता येईल आरक्षण
नव्याने जोडललेल्या व्हिस्टाडोम कोचमध्ये विशेष ट्रेन क्रमांक 02123/02124 चे बुकिंग दि. ८ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि पोहोचण्याच्या स्थानादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे व एसओपीचे पालन करावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App